चिमुर येथे दिनांक 5 ते 8 डिसेंबर राेजी राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज पुण्यतिथी महाेत्सव

Share News

✒️सुयाेग सुरेश डांगे चिमूर (Chimur विशेष प्रतिनिधी)

चिमुर (दि.3 डिसेंबर) : – अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम माेझरी व्दारा संचालित श्री गुरुदेव ग्रामविकास मंडळाचे वतीने दिनांक 5 ते 8 डिसेंबर राेजी चिमुर येथील इंदिरा नगर येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज पुण्यतिथी महाेत्सव आयाेजीत करण्यात आला आहे.

   दिनांक 5 डिसेंबर राेजी पहाटे ग्रामसफाई झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांच्या पुतळयाचे अभ्यंगस्नान व पुजन ग्रामसेवाधिकारी जगन्नाथ गाेडे यांचे हस्ते करण्यात येईल. यावेळी उपग्रामसेवाधिकारी अल्का बाेरतवार, श्री गुरुदेव ग्रामविकास मंडळाचे सचिव देवराव नन्नावरे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर हाेणाऱ्या सामुदायीक ध्यानानंतर रविंद्र वाढई ग्रामगितेचे वाचन करतील. याप्रसंगी दहीकर विद्यालय तळाेधी नाईकचे सचिव निलकंठ सुर्यवंशी यांचे चिंतनपर मार्गदर्शन राहणार आहे. प्रेमीला साेनटक्के यांचे हस्ते घटस्थापना करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता राजेंद्र माेहीतकर यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम आयाेजीत करण्यात आला आहे.

                                             दिनांक 6 डिसेंबर राेजी ग्रामसाई, सामुदायीक ध्यान, ग्रामगीता वाचन, हळदीकुंकु कार्यक्रम, रांगाेळी स्पर्धा, सामुदायीक प्रार्थना, चिंतन आदी विविध कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले असुन यात भक्तदास जिवताेडे, प्रेमीला साेनटक्के, भारत काेडापे, विजय हिंगे व संच आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दिनांक 7 डिसेंबर राेजी ग्रामगीता वाचन कार्यक्रमात ह. भ. प. अशाेकराव चरडे, राजेंद्र खाडे व श्रध्दांजलीपर भजनाच्या कार्यक्रमात अरविंद देवतळे, उर्मीला माेहीतकर, सतीश आडे, ईश्वर कुबडे, भुषण सिडाम, दशरथ आडे, गाेपाल चाैखे, शुभम कराळे आदी सहभागी हाेणार आहेत. सायंकाळी 5 वाजता हाेणाऱ्या माैन श्रध्दांजली कार्यक्रमात प्रा. महादेवराव पिसे, सुखदेव ढाेणे, शंकरराव देशकर, गणेश मडावी, रविंद्र वाढई, विष्णु समर्थ उपस्थित राहणार आहे. रात्राै 9 वाजता ह. भ. प. खेमराज कापसे महाराज यांचे किर्तनाचे आयाेजन केले आहे.

दिनांक 8 डिसेंबर राेजी सकाळी 8 वाजता वं. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांच्या प्रतिमेसह चिमुर शहरात मिरवणुक काढण्यात येणार आहे. यावेळी देवराव नन्नावरे, महादेव पिसे, प्रदिप बंडे यांचा विशेष सहभाग राहणार आहे. सकाळी 11 वाजता ध्वजाराेहण झाल्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन हाेणार आहे. दुपारी 2 वाजता मुख्य समारंभात मार्गदर्शक म्हणुन चिमुर-गडचिराेली लाेकसभा क्षेत्राचे खासदार डाॅ. नामदेवराव किरसान, आमदार बंटी भांगडीया, दैनिक लाेकमतचे संपादक विजय दर्डा, दिलीप छाजेड, जि. प. चे माजी अध्यक्ष डाॅ. सतीश वारजुकर, उपविभागीय अधिकारी किशाेर घाडगे, तहसिलदार श्रीधर राजमाने, ठाणेदार संताेष बाकल, श्रीहरी बालाजी देवस्थानचे अध्यक्ष निलम राचलवार, पप्पुभाई शेख, संदिप कावरे आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहुन सहकार्य करण्याचे आवाहन आयाेजकांनी केले आहे.

Share News

More From Author

अर्जुनी येथे मदर डेअरी दूध संकलन केंद्राचे उदघाटन संप्पन्न

6 डिसेंबर रोजी डोमा येथे विरांगना मुग्दाई जयंती व नागदिवाळी महोत्सव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *