अर्जुनी येथे मदर डेअरी दूध संकलन केंद्राचे उदघाटन संप्पन्न

Share News

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू(दि.2 डिसेंबर) :- येथून जवळच असलेल्या अर्जुनी येथे मदर डेअरी, डी ओ सी सी, एम थ्री एम फाउंडेशन आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अजून येथे मदर डेअरी दूध संकलन केंद्र चालू करण्यात आले. 

                   दूध संकलन केंद्र उद्घाटन अर्जुनी येथील सरपंच सौ सोनाताई हनवते, उपसरपंच प्रफुल भेंडारे, वंधन शेतकरी कंपनीचे अध्यक्ष सुधीर नन्नावरे, दशरथ देहारकार,शैलेंद्र वराडे, प्रकल्प समन्वयक अनिल पेंदाम, मदर डेअरी सुपरवायझर प्रणय आत्राम इत्यादी उपस्थित होते. 

         अर्जुनी परिसरातील चारगाव बु. , चारगाव खु. , तूकूम, वायगाव इत्यादी गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रावर दूध टाकले . हे दूध संकलन केंद्र प्रेरक म्हणून विनोद पाचमणे चालवणार आहे. सकाळ आणि सायंकाळी दोन्ही वेळा दूध संकलन केंद्र चालू राहील. यावेळी प्रकल्प समन्वयक अनिल पेंदाम यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदर डेअरी अर्जुनी येथील संकलन केंद्रावर जास्तीत जास्त प्रमाणात दूध आणण्याचे आवाहन केले आहे. 

                 अर्जुनी येथील दूध संकलन केंद्र चालू करण्यासाठी मदर डेअरीचे एरिया मॅनेजर आशिष शुक्ला, सुधाकर गोठे, प्रणय आत्राम, पंकज मेश्राम, आशिष नागपुरे, देविदास शिंणकडे, विनोद पाचमने, विलास चांभारे, सागर बगडे, विकास जुभाडे यांनी सहकार्य केले.

Share News

More From Author

खरवड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा प्रतिसाद : आरोग्य शिबीर गरजूंसाठी संजीवनी 

चिमुर येथे दिनांक 5 ते 8 डिसेंबर राेजी राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज पुण्यतिथी महाेत्सव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *