खरवड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा प्रतिसाद : आरोग्य शिबीर गरजूंसाठी संजीवनी 

Share News

✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा (Warora प्रतिनिधी) 

वरोरा(दि.1 डिसेंबर) :- तालुक्यातील खरवड येथे हेल्पेज इंडिया , जि एम आर कंपनी मोहबाळा वरोरा व सामाजिक कार्यकर्ते अभिजित कुडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यासाठी ही संस्थेच्या वतीने अश्या प्रकाराचे शिबिराचे आयोजन सातत्याने सुरू आहे.

त्यांच्या कार्याचे कौतुक सर्वत्र होत असून. गरजूंना मदत म्हणून सर्व प्रकाराचे तपासणी मोफत करून त्यांना औषधी मोफत दिले जाते. सामाजिक कार्यकर्ते अभिजित कुडे यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या पुढे संपूर्ण भागात अश्या प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. मोफत नेत्र तपासणी तसेच शस्त्रक्रिया सुद्धा करून देणार आहे. राशिदा शेख मॅडम यांचे आभार त्यांनी त्यांच्या या पुण्याच्या कार्यात हातभार लावण्याची संधी दिली.

खरवड येथील ज्येष्ठांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी रोशन भोयर, रामानंद वसाके, प्रफुल गीरटकर व युवकांनी सहकार्य केले. सरकारी रुग्णालय वरोरा मनोज पाल coordinator, प्रणाली सोनटक्के प्रयोगशाळा तंत्रज्ञ,हेल्पज इंडिया टिम वरोरा , मेडिकल कंन्सलटंट संदिप नरवाडे,सौ राशिदा शेख , वैभव देठे फार्मासिस्ट, संदिप काळे वाहक, यांच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वी झाले. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

ग्रामीण भागात आरोग्याची जागृती होणे आवश्‍यक आहे. गंभीर आजार झाल्यावर ग्रामस्थ औषधोपचारासाठी धावतात. मात्र वेळेवर आजाराचे निदान झाल्यास भविष्यातील गंभीर धोके टाळता येतात. यासाठी आरोग्य शिबिर गरजूंसाठी संजीवनी ठरत आहे. आरोग्य सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा आहे. आरोग्य सेवेतून एखाद्याचे जीव वाचविण्याचे समाधान मिळते. गरजू घटकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांना शिबिराचा आधार मिळत आहे. खरवड ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर झाले यशस्वीपणे पार पडले.

Share News

More From Author

शेतकऱ्यांना दामदुप्पट भावाची प्रतीक्षा विधानसभा निवडणूक संपल्या तरी शेत पिकांचे भाव काही वाढेना

अर्जुनी येथे मदर डेअरी दूध संकलन केंद्राचे उदघाटन संप्पन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *