ग्रंथालय पुस्तकांची स्तरनिहाय निर्मितीसाठी कवी. नरेन्द्र कन्नाके यांची निवड

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.21 ऑक्टोबर) :- समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रम सन 2024 – 25 साठी ग्रंथालय पुस्तकाची स्तरनिहाय निर्मितीसाठी तालुक्यातील निवडक शिक्षकांची जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे माननीय प्राचार्य राजकुमार हिवारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित केली होती.

ग्रंथालय उपक्रमासाठी विविध थीमनुसार, स्तरनुसार पुस्तकांची निर्मिती करून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध माध्यमातून शाळांना पुस्तके वितरित करण्याच्या उद्देशाने मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमातून पुस्तकाची निर्मिती होणे अपेक्षित आहे. असे आवर्जून सांगण्यात आले.

उपस्थित असलेल्या शिक्षकांमधून स्तरनिहाय ग्रंथालय पुस्तकाची निर्मिती केली गेली. जिल्हा पुस्तक निवड समितीच्या माध्यमातून स्तर वर्ग 9 व 10 करिता कवी, लेखक व निवेदक, महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. नरेन्द्र कन्नाके (नेहरू विद्यालय शेगाव त.वरोरा) यांचे ‘मातीच्या पाटीवर’ पुस्तकांचे ग्रंथालय निर्मिती करीता चंद्रपूर जिल्हा मधून राज्यस्तरावर निवड झालेली आहे.

यापूर्वी त्यांनी सन 2023 – 24 करीता सेतू अभ्यास सामाजिक शास्त्र वर्ग 9 वी चे लेखन केले आहे. त्यांच्या यशाबद्दल डॉ. हेमचंद कन्नाके, आईबाबा, सर्व कन्नाके परिवार तसेच शाळेचे मुख्याध्यापक बी.जी. ढाकुणकर व सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेले आहेत.