मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी गांधी विचार आचरणात आणणे आवश्यक : अ‍ॅड. विवेकानंद घाटगे

Share News

🔹अ‍ॅड. विवेकानंद घाटगे, बबनराव रानगे यांना महात्मा गांधीजी जीवन गौरव तर सुरेश डांगे यांना विचार गौरव पुरस्काराने सन्मानित

✒️कोल्हापूर(Kolhapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.2 ऑक्टोबर ) :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला अहिंसेचा आणि सत्य धर्माचा संदेश दिला आहे. जगभर महात्मा गांधीजींची पुन्हा पुन्हा आठवण काढली जाते. महात्मा गांधीजीचे विचार समजून घेऊन जगणे गरजेचे आहे. कारण गांधी विचार मानवी जीवन समृद्ध करणारा आहे असे प्रतिपादन अ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांनी केले.

ते कोल्हापूर येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महात्मा गांधीजी नवविचारमंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 

यावेळी यावर्षीचा नावाजलेला, स्वाभिमानाचा, अभिमानाचा महात्मा गांधीजी विचार जीवन गौरव पुरस्काराने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोव्याचे माजी चेअरमन आणि सुप्रसिद्ध कायदेतज्ञ अ‍ॅड. विवेकानंद घाटगे, मल्हार सेना महाराष्ट्र राज्याचे सरसेनापती आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबनराव रानगे यांना राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी मानाची गांधी टोपी, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि दहा हजार रुपये किंमतिची पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी बबनराव रानगे म्हणाले, महात्मा गांधीजी यांचे विचार मानवी समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्यामुळे ते सर्व मानवाने अंगीकारले पाहिजेत. त्यांच्या विचाराने मार्गस्थ होणे मानवी समाजाच्या हिताचे आहे. 

यावेळी डॉ. विश्वास सुतार म्हणाले, महात्मा गांधीजी अजरामर असे जागतिक विचारवंत आहेत. त्यांचे अहिंसावादी तत्त्वज्ञानच मानवी विकासाला मदत करणारे ठरणार आहे. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला निर्मिती फिल्म क्लब, निर्मित “गांधी मरत नसतो!” या लघुपटाचा प्रीमियर शो संपन्न झाला.

यावेळी महात्मा गांधीजी विचार गौरव पुरस्कारांने प्रियांका चेतन पाटील, सुभाष गायकवाड, अमोल सावंत, रमेश बुटे, सरिता कांबळे, दशरथ तुपसुंदर, सुलोचना चिंदके, अनिता गवळी, कुसुम राजमाने, रामकृष्ण जोडवे, काळूराम लांडगे, डॉ. हाशिम वलांडकर, स्वाती कुंभार, भगवान जाधव, सुरेश डांगे, शंकर पुजारी, तानाजी कुंभार यांना मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रा. टी. के. सरगर, अनिल म्हमाने, अ‍ॅड. करुणा विमल, अंतिमा कोल्हापूरकर, अनिता गायकवाड, प्रियांका पाटील, दत्तात्रय गायकवाड यांची भाषणे झाली.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, गायक आणि संगीतकार डॉ. विश्वास सुतार यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची मराठी विषयातील विद्यावाचस्पती (Ph.D.) ही शिक्षण क्षेत्रातील सन्मानाची पदवी प्राप्त केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. 

यावेळी बयाजी शेळके, वसंतराव मुळीक, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अ‍ॅड. प्रशांत देसाई, दिग्विजय कांबळे, सनी गोंधळी, रामचंद्र रेवडे, शिकंदर तामगावे, बाबुराव बोडके, नितेश उराडे, राघू हजारे, शहाजी शीत, डॉ. सुजाता नामे, निती उराडे यांच्यासह गांधीवादी विचारांचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share News

More From Author

वाघाच्या हल्ल्यात गाय ठार 

आदिशक्ती चिखलीची रेणुका माता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *