चिमूर विधानसभेत फक्त विकासाची बोंब, वास्तविकता भयानक, फोकनाडबाजीत अव्वल- आम आदमी पार्टी चा आरोप

Share News

🔸शासकीय निधीचा गैरवापर, रस्त्यांची दुर्दशा, मोठ्या भ्रष्टाचाराची आशंका, सखोल चौकशीची मागणी करणार- प्रा. डॉ. अजय पिसे

✒️शुभम गजभिये चिमूर(Chimur प्रतिनिधी) 

चिमूर(दि.9 ऑगस्ट) :- खराब रस्त्यामुळे येनुली माल येथे नुकत्याच झालेल्या अपघातात चिमूर आगाराची बस पलटली सुदैवाने बारा लोकांचे प्राण वाचले. दररोज सोशल मिडियावर विकासाचा बोभाटा करणारे व विकासपुरुष म्हणून मिरविणारे लोकप्रतीनिधिनी या प्रकरणाची जबाबदारी घेणार का असा प्रश्न आम आदमी पार्टी चे चिमूर विधानसभा समन्वयक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी विचारला आहे.

चिमूर-नागभीड विधानसभेतील प्रत्येक गावात उखळलेले रस्ते, नळाला गढूळ पाणी, गळत असलेल्या शाळा, सगळीकडे घाणीचे साम्राज्य असे चित्र पाहायला मिळत आहे. अमाप पैसा ओतूनही प्रत्येक गावात उन्हाळ्यात पाण्याची सोय नसते तर पावसाळ्यात हानिकारक गढूळ पाणी पुरवठा होत असतो. निष्क्रिय नेतृत्व, नियोजनशून्य काम व पैश्याचा गैरव्यवहार यामुळे या भागात भ्रष्टाचार फोफावलेला आहे.

पन्नास वर्ष आयुष्य अपेक्षित असलेले सिमेंट रस्ते पहिल्याच वर्षी उखळून पडत आहेत, काही रस्ते पहिल्याच पावसात वाहून जात असतांना दिसले. कोरंभी, गिरगाव, रेन्गाबोडी या गावाकडे जाणारे रस्ते आपल्या विधानसभेच्या विकासाचा खरा आरसा दाखवितात.

चिमूर-नागभीड विधानसभेत मोठा भ्रष्टाचार दडलेला असून त्यापासून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी व आपली निष्क्रियता लपविण्यासाठी लोकप्रतिनिधी समाजसेवेचा आव आणून वेगवेगळ्या कृप्त्या करतांना दिसतात. करोडो रुपयांचा निधी वापरून बनलेले रस्ते, पूल एकाच वर्षात उखळून जात असतील तर हा जनतेच्या पैश्याचा मोठा भ्रष्टाचार आहे याच्या सखोल चौकशीचा आग्रह धरणार असल्याचे प्रा. डॉ. अजय पिसे यांनी सांगितले.

Share News

More From Author

अतिप्रभावित मेगा पाणलोट प्रकल्प अंतर्गत खेमजई येथे ओ.डी.के. सर्वे सपन्न

आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या शुभहस्ते श्री गुरूदेव सेवा मंडळ, चिमूर येथे ५० लक्ष रुपयांच्या सामाजिक सभागृह बांधकामाचा शुभारंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *