बल्लारपूर वनक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात नामदेव आत्राम ठार

🔹बल्लारपूरातील नागरिक भयग्रस्त

🔸वाघ/बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.15 मार्च) :- बल्लारपूर शहरात बिबट्या आणि वाघाची दहशत वाढली असून काल १३ मार्च रोजी जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या इसमाला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवार दि.१४ फेब्रुवारीला उघडकीस आली असून सर्वत्र एकाच खळबळ उडाली असून जंगल शेजारी असलेल्या नागरिकांत कमालीची दहशत पसरली असून वाघ व बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

प्राप्त माहितीनुसार, रविंद्र वार्ड निवासी नामदेव आत्राम (६७) काल दि.१३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास जंगलात सरपण आणायला गेले होते मात्र सायंकाळ पर्यंत घरी परतले नाही.त्यामूळे घरचे तसेच परिसरातील नागरिक जंगलात जाऊन शोध घेतला असता त्याचा पत्ता लागला नाही.या बाबतची माहिती बल्लारपूर वनपरिक्षेत्रात देण्यात आली.गुरुवार सकाळ पासून वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे आणि त्यांचे सहकारी जंगलात गस्त सुरू केली असता दुपारच्या वेळेला नामदेव आत्राम याचे प्रेत मिळाले असून वाघाने मुख्य मार्गावरून जंगलात अंदाजे दोन किमी फरकटत नेले असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

कालच बिबट्या ने सोफिया नामक मुलीला जखमी केले होते. त्या बिबट्याला काल रात्री ८ वाजताच्या सुमारास जेरबंद करण्यात आले. सदर वाघाला जेरबंद करण्याकरिता जंगलात पिंजरे लावले असून दोन रेस्कु पथक दाखल झाले आहेत. मृतक नामदेव आत्राम यांचा परिवाराला २५ हजार रुपये ची आर्थिक मदत वन विभाग कडून देण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी दिली.

सदर प्रकरणात पुढील कार्यवाही चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डु, सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश भोवरे करीत आहेत.

  बल्लारपूर शहरालगत असलेल्या लोकवस्तीत जंगली प्राणी सतत हैदोस घालत असून नागरिकांचे नाहक जीव जात असून जनमानसात कमालीची दहशत पसरली आहे.या प्रकाराची दखल वनविभागाने घेऊन मनुष्यबळी घेणाऱ्या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा.जंगल परिसरात वनकर्मचार्यांच्या गस्तीत वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.