वाल्मिक केदार यांचं इंस्टाग्राम वर धुमाकुळ घालणार “टाकनी दिल तोडी” हे अहिराणी सॉंग लवकरच आपल्या भेटिला येणार

71

✒️ चाळीसगाव(Chalisagaon विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चाळीसगाव (दि.1 मार्च) :- खानदेशी कॉमेडियन – विकी पाटील तसेच डायरेक्शनचे काम प्रसिद्ध अभिनेते अजय माळी हे करणार आहेत. या गाण्याचे लेखन मगन भाऊ सोनवणे भडगावकर यांनी केल आहे व प्रसिद्ध गायक गोविंद गायकवाड यांचा आवाज या गाण्यात तुम्हाला ऐकायला मिळणार आहे.

इंस्टाग्राम ला हे सॉंग सध्या ट्रेंडिंग ला असुन ह्या सॉंग च्या 5 हजार पेक्षा जास्त रिल्स् अनेक इंस्टाग्राम युजर्स ने बनवल्या आहेत, इंस्टाग्राम वरील युजर्स चा उदंड प्रतिसाद बघुन असे वाटते कि ह्या सॉंग ला युट्युब वर आल्यानंतर देखील असाच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

या गाण्याची मार्केटिंग हेड – प्रदीप भाऊ धरणगावकर आहेत.. या गाण्याची रेकॉर्डिंग – आनंद सूर्यवंशी बांबरुड यांनी केली असून या गाण्यातील संगीत – विलास वाघ यांनी दिले आहे तसेच डीजे लखन व डीजे गोलू यांनी या गाण्याला बनवले आहे… लवकरच हे इंस्टाग्राम वर धुमाकूळ घालणार गाणं युट्युब वर प्रेक्षकांना वाल्मीक केदार या यूट्यूब चैनल वर बघायला मिळणार आहे.

अनमोल सहकार्य : अंकुश भाऊ कुमावत, सतिष जाधव, प्रदीप, पंकज रावते,सुमित महाजन, मगन सोनवणे, भास्कर फाजगे,सोमनाथ गायकवाड, मनोज सोनवणे, उदय पाटील, शिवाजी माळी, रावसाहेब महाजन, मनोज मोरे,सुशील सूर्यवंशी, तसेच इंस्टाग्राम मित्रपरिवार.