प्रेम प्रकरणातून मुलीची हत्या

93

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.17 फेब्रुवारी) :- बल्लारपूर शहरात प्रेम प्रकरणातून मुलीची हत्या झाल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली आहे. येथील महाराणा प्रताप वार्ड सम्यक चौक येथे एका घरा मध्ये मुलीची हत्या केल्याची घटना आहे. सम्यक चौक येथे राहणारे राम बाई दहागावकर आपल्या कामावरून परतल्यावर तिला घरी एक मुलगी रक्तबंबाळ होऊन पडून दिसली. तिने लगेच परिसरातील लोकांना सांगितले. त्या मुलीच्या डोक्यावर मार असून राम बाई चा मुलगा सीनु दहागावकर वय २९ वर्ष याने तिच्या हत्या केल्याचे बोलले जात आहे.

सीनु दहागावकर नुकताच जेल मधून सुटून आला होता. सीनु आणि त्या मुलीचे प्रेम प्रकरण सुरू होते.त्यात त्या मुलीला आपल्या घरी बोलवले होते.मुलगी येथील डॉ. झाकीर हुसेन वार्ड दत्त मंदिर परिसरातील असून प्रेम प्रकरणातून हत्या केल्याचे बोलले जात आहे. सीनु हत्या करून पसार झाला आहे. 

     पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.