मोराच्या शिकार प्रकरणी 3 जणांना अटक

Share News

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.17 जानेवारी) :- सोमवार दुपारी तिन वाजताचे दरम्यान सतीश शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा यांना वाघोली येथे मोराची शिकार झाल्याची गुप्त माहिती मिळाली असता सापळा असून आरोपीला पकडण्यात आले.

राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार झाल्याच्या गुप्त माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वनकर्मचारी जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, डि. बी. चांभारे क्षे. स. टेमुर्डा चंदेल वनरक्षक, लडके वनरक्षक व बोढे वनरक्षक यांनी घटणास्थळी जाऊन चौकशी केली असता आरोपी नामे विलास आडकु नन्नावरे वय. 42 वर्षे पो. शेगाव. ता. वरोरा, संयुक्त वनव्यवस्थापन समिती वाघोली अध्यक्ष 2) रामदास वामन जिवतोडे वय. 34 वर्षे पो. शेगाव. ता. वरोरा व 3) दिगांबर तुळशिराम गजबे रा. वाघोली वय. 33 वर्षे पो. शेगाव. ता. वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचे जवळ मोराचे 3.100 ग्रॅम मास, लोखंडी सुरा 01 नग, लोखंडी हुक 01 नग, मोराचे पाय 04 नग, मोराचे पंख व औषधी टाकलेले धान्य 1 किलो असा मुद्देमाल आढळून आला असुन साहित्य जप्त करण्यात आले असुन त्याचेवर प्रा.अ.सु.क्र. 09169/229205 दिनांक 15/01/2024 भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9, 51 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

पुढील तपास प्रशांत खाडे विभागीय वनअधिकारी चंद्रपूर व घनश्याम नायगमकर सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू), (अतिरिक्त) चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सतिश शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा, जितेंद्र लोणकर क्षे. स. शेगाव, दिवाकर चांभारे, क्षे. स. टेमुर्डा, चंदेल वनरक्षक मेसा, लडके वनरक्षक साखरा, बोढे वनरक्षक शेगाव, तिखट वनरक्षक वरोरा व नेवारे वनरक्षक आजनगाव करीत आहे.

Share News

More From Author

श्रीराम भक्तीचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज व्हा …ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूरकरांना आवाहन

काटवल (तु) येथील राॅक्स क्रिडा मंडळाला क्रिडा साहित्याचे वितरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *