त्यामृत कुटुंबीयांना आमदार प्रतिभा ताई धानोरकर यांच्या हस्ते धनादेश वाटप

127

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु (दि.22 डिसेंबर) :- मागील काही महिन्यांपूर्वी शेगाव बू येथील नव युवक घोडझरी तलाव या ठिकाणी एन्जॉय मोज मस्ती करण्यासाठी गेले असता यात येथील तीन चार युवक तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा येथील आमदार प्रतिभाताई सुरेश धानोरकर यांनी या पीडित कुटुंबाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व पीडित कुटुंबाला शासन कडून काही आर्थिक मदत मिळून देण्याचे आश्वासन दिले होते. 

    परंतु अखेर आमदार महोदय यांनी आपला शब्द पाडत शासन दरबारी या गंभीर विषयाला हाताशी घेऊन शासनाकडून निधी प्राप्त केला. यात 

जहागिर गजानन झाडे, वय-27 वर्ष मौजा – मौजा शेगाव

2. मनिष भारत श्रीरामे, वय-32 वर्ष मौजा – मौजा शेगाव

3. चेतन भिमराव मांदाडे, वय- 21 वर्ष मौजा – मौजा शेगाव

4. संकेत प्रशांत मोडक, वय-25 वर्ष मौजा- गिरोला इत्यादी कुटुंबाला आज आमदार प्रतिभाताई सुरेश धानोरकर यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.

वरोरा तालुक्यातील शेगाव बू येथील 04 युवकाचा ब्रम्हपुरी येथील घोडाझरी तलावात बुडून दु:खद मृत्यु झालेला होता. सदर प्रकरणात तहसिल प्रशासनाच्या वतीने मा.जिल्हाधिकार, चंद्रपूर यांचे मार्फत प्रस्ताव मुख्यमंत्री साहायता निधीकरीता मंत्रालयात सादर करण्यात आलेला होता.

सदर प्रकरणात मा.आमदार महोदय, मा.जिल्हाधिकारी महोदय, मा.उपविभागीय अधिकारी, वरोरा व मा.तहसिलदार, वरोरा यांचे विशेष पाठपुराव्याने मृतकाचे वारसांना मुख्यमंत्री साहायता निधीतुन प्रत्येकी 1.00 लक्ष प्रमाणे एकूण 4.00 लक्ष रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. सदर निधी मृतकाचे कायदेशिर वारसांना आज दिनांक 22/12/2023 रोजी मा.आमदार महोदयांच्या वतीने प्रदान करण्यात येत आहे.

श्री राजेंद्र चिकटे माजी सभापती कृ ऊ बा वरोरा विजय आत्राम माजी अपसभापती पं स. वरोरा काळे साहेब नायब तहसीलदार वरोरा अजय निखाडे मंडळ अधिकारी शेगांव महादेव कोटकर चंदूभाऊ जैस्वाल संजय कोटकर गोलू वाढई ग्राप सदस्य शेगांव दिवाकर मेश्राम व शेगांव वासीय उपस्थित होते

आमदार प्रतिभाताईं धानोरकर याच्या विशेष प्रयत्नातुन हा निधि मिळाला हे मात्र विशेष.