धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करिता विधान भवनावर भव्य मोर्चा

Share News

🔹राज्यातील धनगर समाज बांधव मोर्च्यात लखोंच्या संख्येने उपस्तित राहणार….माजी जि. प. अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे

✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.2 नोव्हेंबर) :-  धनगर समाज तब्बल 75 वर्षापासून अनुसूचित आरक्षणापासून वंचित आहे राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी वारंवार खोटी आश्वासने देऊन समाजाची दिशाभूल केली त्यांना येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धनगर समाज जागा दाखवेल असा इशारा सकल धनगर समाज समन्वय समिती च्या वतीने देण्यात आला आहे.

        अनुसूचित जमाती आरक्षणासाठी अंमलबजावणी करावी या मुख्य मागणी करिता येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूर विधान भवनावर सकल धनगर समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता यशवंत स्टेडियम नागपूर येथुन विधान भावनावर भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.

आयोजित मोर्चा हा कोणत्याही राजकीय पक्षाद्वारे आयोजित केला नसून समाजातील समाजिक संघटनांचे पुढाकाराने आयोजित करण्यात येत आहे.त्या करिता समाजाच्या घटनादत्त व न्यायोचित मागण्यांसाठी राज्यातील लाखोच्या संख्येने मोर्च्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येने मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी नागपूर येथील धनगर समाज पदाधिकारी यांनी वरोरा दौऱ्यावर आले असता येथील समाज बांधवाना संबोधित केले.

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे, सेनेट सदस्य वामनराव तुर्के, धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अनिलराव ढोले, धनगर युवक मंडळाचे रमेश पाटील, अँड मार्तंड गोडे, उत्तमराव चिव्हाने, गणेशराव पावडे, शिरीष उगे उपस्थित होते.

Share News

More From Author

राजकीय कार्यकर्तेच बनले रेती चोर,पारोधी नदीतून सर्रास रेतीची चोरी. महसूल विभाग झोपेत

६ नोव्हेंबर रोजी विठ्ठल हनवते यांच्या वाढदिवसानिमित्त चंदनखेडा येथे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *