संतापजनक…. ताडगव्हान येथील शेतकरी मारहाण प्रकरणी आरोपी अजूनही मोकाटच 

🔸जीवे मारण्याचा पर्यंत करणाऱ्या आरोपी विरोधात कलम 307 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी. चौकशी पोलीस कर्मचारी वादात 

✒️ मनोहर खिरटकर खांबाडा (Khambada प्रतिनिधी)

खांबाडा(दि.29 नोव्हेंबर) :- वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या ताडगव्हान येथील पोलीस पाटिल जितेद्रं खारकर यांचे वडील आत्माराम निंलकंठ खारकर या शेतकऱ्याला वाटेत अडवून जुन्या वैमनसातून बदला घेण्यासाठी त्याच गावातील रहिवासी असणारे संजय चिंतामण डाखरे यांनी लाठीने मारहाण करून जीवे मारण्याचा पर्यंत केला.

त्यात त्यांना आत्मारामजी खारकर यांच्या डोक्यावर वार झाल्याने मोठे रक्त गेले तर डावा हात, आणि डावा पायाला मार लागला, एक बरगडी ला मोठी दुखापत झाली आणि डाव्या हाताची मनगटाचे हाड मोडुन असल्याचे डाँक्टरनी सांगीतले याबाबत शेगाव पोलीसस्टेशनला तक्रार दाखल केली असता पोलीस प्रशासनाने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कलम 307 अंतर्गत कारवाई करायला हवी होती.

परंतु त्यांनी केवळ कलम 324 अंतर्गत कारवाई केली. दरम्यान हा गुन्हा दखलपात्र असला तरी त्यात जमानत तात्काळ मिळतं असल्याने आरोपी मोकाट फिरत आहे व तो फिर्यादी च्या कुटुंबाला ललकारत असल्याने ते कुटुंब दहशत मध्ये आहे. दरम्यान पोलिसांनी थातुरमातुर चौकशी केली व आता बिटजमादार आखाडे व कौरासे हे फिर्यादि कडून पैसाची मागणी करत आहे असे बोलले जात आहे. 

संजय चिंतामण डाखरे हा गुन्हेगारी व्रुत्तिचा व्यक्ती असल्याने त्यांचेवर खरे तर गंभीर गुन्हे दाखल करायला हवे होते, कारणं त्याला पोलिसांची कुठलीही भीती राहिली नसून त्यांच्या गुंडगिरीमुळे गावात कायदा सुव्यवस्था बिघडत आहे त्यामुळं शेगाव पोलिसांनी त्याच्यावर कलम 307 व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करून गुन्हेगारीवर आळा बसवावा अशी मागणी गावकऱ्यांच्या माध्यमातून होत॑ आहे.