तणनाशकाची फवारणी करून केले सोयाबीन पिकाची नासाडी  Soybean crop was destroyed by spraying herbicide

Share News

▫️राळेगाव येथील प्रकार

▫️आरोपीवर कारवाईची मागणी

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.20 सप्टेंबर) :- येथून जवळच असलेल्या राळेगाव येथील श्री भूपाल महादेव शंभरकर यांच्या शेतामध्ये मानाने डोलत असलेल्या सोयाबीन पिकावर येथील एका इसमाने तणनाशकची फवारणी करून शेतामध्ये असलेले सोयाबीन पीक नष्ट केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

        सविस्तर वृत्त असे की गेल्या 15 दिवसा अगोदर पिढीत शेतकरी श्री भूपाल शंभरकर यांच्या शेता मध्ये असलेल्या पिकावर राळेगाव येथीलच आरोपी सुरेश जांभुळे यांच्या सह त्यांच्या सहकार्याने जाणीवपूर्वक कुकर्म करून पीडित शेतकऱ्याच्या भर पिकावर तणनाशक फवारणी करून त्यांची सर्व पिके नष्ट केले त्यात पीडित शेतकरी शंभरकर यांचे फार मोठे नुकसान झाले असून याचा फार मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे.

तेव्हा पीडित शेतकरी यांनी आपल्या हक्काच्या मागणी साठी स्थानिक शेगाव बू येथील पोलीस स्टेशन गाठून झालेल्या सर्व प्रकारची तोंडी तक्रार दाखल करून लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली. परंतु या गंभीर समस्या कडे पीडित शेतकऱ्याच्या मागणीला लाथ मारून यांच्या तक्रारीवर शेगाव पोलिसांनी कसलीही कारवाई केली नाही .. त्यामुळे गेले 15 दिवस लोटून गेल्याने आरोपीची छाती अधिक फुलली असून त्यांची गावात दहशत निर्माण झाली आहे …

       आरोपी सुरेश जांभुळे हे या शेतीवर आपली करडी नजर ठेऊन ही शेती बळकविण्याच्या प्रयत्नात आहे परंतु ही शेती सर्वस्वी पीडित शेतकरी श्री भूपाल शंभरकर यांच्या आजो वडिलोपर्जित असून या शेतीचा सर्व कागद पत्र तसेच सात बारा त्यांच्या वडिलांच्या नावाने आहे शिवाय या संदर्भात याचा खटला मा. दिवाणी न्यायालय वरोरा येथे सुरू असून सर्व जमिनीची वहिवाट करण्यासाठी वाहण्यासाठी कब्जा हा पीडित शेतकऱ्याकडे आहे .

यावर कोर्टाचा स्टे देखील आहे जो पर्यंत न्यायालयाचा निकाल जाहीर होणार नाही तो पर्यंत ही शेत जमीन पीडित शेतकऱ्याच्या स्वाधीन असल्याचे पीडित शेतकऱ्यांनी सांगितले . करिता देखील येथील आरोपी सुरेश जंभुळे यांनी तसेच यांच्या अन्य साथीदारांनी यांच्या सहा एकर शेतामध्ये असलेले सोयाबीन पिकावर जाणीव पूर्वक तननाशक फवारणी करून यांची पीक नष्ट केले यात त्यांचे किमान पाच लाख रुपयाचे मोठे नुकसान झाले असल्याचे पीडित शेतकरी शंभरकर यांनी सांगितले .

        शेतामध्ये असलेले हिरवेगार पीक मृतावस्थेत येत असून यात कोणतेही उत्पन्न होणार नाही त्यामुळे शेतकऱ्याला फार मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे त्यामुळे कुकर्म करणाऱ्या दोषी आरोपीवर कडक कारवाई करून अटक करण्यात यावी तसेच झालेल्या नुकसानीची परतफेड म्हणून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी भूपाल महादेव शंभरकर यांनी केली आहे.

Share News

More From Author

शेतकऱ्यांना पीककर्जाप्रमाणे एकरी व सानुग्रह अनुदान अशी सरसकट ५० हजार रु. मदत तात्काळ द्यावी : रविंद्र शिंदे

वरोरा तालुक्यातील शेगाव चारगाव परिसरातील शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या…प्रहार सेवक अक्षय बोंदगुलवार Compensate the farm in Shegaon Chargaon area of Warora taluka and pay compensation…Prahar Sevak Akshay Bondgulwar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *