किशोर टोंगे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच रक्तदान

Share News

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि .9 सप्टेंबर) :-

         वरोरा येथील सामाजिक कायकर्ते तथा वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे उच्चशिक्षित युवा नेतृत्व किशोर टोंगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी किशोर टोंगे मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने दिवसभरात मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली तर कामगारांसोबत वाढदिवस साजरा करताना टी-शर्ट आणि फळे वाटप केले. 

तसेच अंध विद्यालय आनंदवन आणि आनंद मुक बधिर विद्यालय आनंदवन या शाळेमध्ये जाऊन अनाथ, अपंग, अंध,मुक बधिर विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला.

जनसंपर्क कार्यालयात वरोरा भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागातून शहरातून भरपूर कार्यकर्ते शुभेच्छा देण्याकरिता आले होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून शुभेच्छा दिल्या. 

या रक्तदान शिबिरासाठी जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर येथील टीमचे सहकार्य लाभले. यासाठी ब्लड बँक व रक्तदान करणाऱ्या कार्यकर्त्यांचे किशोर टोंगे मित्र परिवाराच्या वतीने आभार माणण्यात आले.

Share News

More From Author

आर्णी येथे क्रांतीसूर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राचे उद्घाटन कार्यक्रम 

ओबोसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या…किशोर टोंगे यांची भूमिका Give reservation to Maratha community without disturbing Obosi’s reservation…Kishore Tonge’s role

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *