पिजदुरा येथे ‘गाजरगवत निर्मूलन सप्ताह’ साजरा

Share News

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.25 ऑगस्ट) :- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे व आधुनिक शेती पद्धतीची माहिती मिळावी व त्यातून त्याच्या आर्थिक उत्पादनात वाढ होऊन शेतकरी समृद्ध व्हावा याकरिता नवनवीन आधुनिक प्रयोगात्मक माहिती देण्यासाठी महारोगी सेवा समिती द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित आनंद निकेतन कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पिजदुरा येथे कृषी दुतांनी गाजरगवत निर्मूलन सप्ताह साजरा केला.

गाजरगवत हे गवत मोठ्या प्रमाणावर आढळते. हे गवत आरोग्यासाठी अत्यंत घातक असते. या गवतामुळे अनेक प्रकारचे आजार होतात जसे की अस्थमा व त्वचारोग होतो. गाजरगवताची उत्पत्ती पहिल्यांदा पुणे येथे झाली होती. हे एक विदेशी गवत आहे. या गवताची निर्मूलन व्हावे यासाठी पिजदुरा येथे सातव्या सत्राचे विद्यार्थी यांनी एक सप्ताह गाजर गवत निर्मूलन करण्यासाठी राबविला.

या सप्ताहाद्वारे विद्यार्थ्यांनी गावामध्ये जनजागृती केली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी गावच्या जिल्हा परिषद शाळेचे चिमुकल्यांसोबत गावांमध्ये एक प्रभात फेरी काढली, ज्यामध्ये चिमुकल्यांनी “गाजरगाव टाळा आरोग्य पाळा” अशी घोषणा देत गावामध्ये जनजागृती केली. कृषी दुतांनी गावातील लोकांसोबत गाजरगवत काढण्याचा प्रयत्न केला. कृषी दुतांनी गावकऱ्यांना गाजरगवत मार्गदर्शन तक्ता दिला. तसेच या सप्ताह मध्ये मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी सहभाग घेतला व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पोतदार सर, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. व्ही. महाजन , कार्यक्रम समन्वक डॉ. एस. एन. पंचभाई , डॉ. ए. ए. मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमांमध्ये सातव्या सत्राचे विद्यार्थी हर्षल लोथे, शुभम गुंजाळ, ज्ञानेश्वर तायडे, हिमांशू सोनटक्के, भवानी प्रसाद व स्वरांशु मून इत्यादी सहभागी होते.

Share News

More From Author

अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुलगा बनला मुख्याधिकारी

भद्रावती जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *