समय टोंगे चा नीट परीक्षेतील नेत्रदिपक  यश प्राप्त केल्याबद्दल सत्कार Samay Tonge felicitated for his spectacular success in the NEET examination

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)

भद्रावती :- शहरातील गौतमनगर येथील रविकांत रामभाऊ  टोंगे यांचा मुलगा समय याने राष्ट्रीय पात्रता वैद्यकीय प्रवेश परीक्षा २०२३  नीट मध्ये नेत्रदिपक यश संपादित केले आहे. समय ला  सातशे वीस  पैकी सहाशे अठ्ठावीस गुण मिळाले आहे. सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने  समय टोंगे चा नुकताच सत्कार करण्यात आला. या प्रसंगी  समयचे वडील रविकांत, आई वैशाली, भाऊ अर्थ आणि आजोबा रामभाऊ टोंगे उपस्थित होते.

      ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे यांच्या शुभहस्ते वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखीत ग्रामगीता आणि पुष्पगुच्छ देऊन समय टोंगे चा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना(ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख तथा नगरसेवक नंदु पढाल , शहरप्रमुख घनश्याम आस्वले आणि प्रहार शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष शंकर मिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.