विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या  Farmer comments suicide by consuming poison

378

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.17 एप्रिल) :- 

                चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी बूज. येथे आज युवा शेतकरी याने कीटक नाशक विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.सततच्या नापिकीला कंटाळून वणी बु.येथील लहू तुकाराम देवकते या 45 वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतातच विष प्राशन केल्याची घटना १५ एप्रिल रोजी घडली.

त्यानंतर त्यांना उपचारासाठी चंद्रपूरच्या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते माञ उपचारादरम्यान त्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.

                  अतिदूर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात मागील अनेक वर्षापासून शेतकरी नापिकीला कंटाळून आत्महत्या करण्याचे सञ सुरूच आहे.१५ एप्रिल रोजी वणी बु.येथील शेतकरी लहू तुकाराम देवकते या शेतकऱ्याने सुध्दा सततच्या नापिकी व डोक्यावरच कर्ज फेडायचे कसे आणि संसाराचा गाडा चालवायचा कसा या विंवचनेत असलेल्या लहूने आपल्या शेतातच विषारी औषधी प्राशन केली.

याची माहिती कुटुंबीयांना मिळताच आरडाओरडा करित त्यांना उपचारासाठी चंद्रपूरच्या खाजगी दवाखान्यात दाखल केली माञ उपचारादरम्यान त्या शेतकऱ्याची प्राणज्योत मावळली.मृत्यक शेतकरी लहू देवकते यांना दोन मुले व दोन मुली असून त्यांनी जिवती येथील विदर्भकोकण ग्रामिण बँकेतून कर्ज घेतले होते.