चिमूर तालुकयातील पांदन रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करा Paving of pandan road in chimur taluka

🔸मातोश्री पांदन रस्ते योजना आहे तरी कोणासाठी?

🔹शेतकरी सुखी तर जग सुखी असे म्हणतात,नुसते बोलून चालत नाही.योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे….प्रहार सेवक विनोद उमरे

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.17 एप्रिल) :-

      चिमूर तालूक्यातील ग्रामीण भागातील पांदन रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करण्यात यावे.चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस ,धान उत्पादक शेतकरी बांधवाना शेतीची विविध कामे करण्यासाठी पांदन रस्ता वरुन आवागमन करावे लागत आहे.

परंतु सदर बरेच रस्ते कच्चे असल्याने सोयाबीन, कापूस धान, उत्पादक शेतकरी बांधवाना शेतावर ये-जा करण्यासाठी शारिरीक, मानसिक भावनिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सकृतपने दिसून येत असून पावसाळ्यामध्ये तारांबळ उडत असते.

पांदन रस्ताच्या समस्येमुळे शेतीची कामे करण्यास विलंब होत असतो चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील गाव निहाय पांदन रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करुन सोयाबीन, कापूस ,धान, शेतकरी यांना दिलासा होतील त्यामुळे चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पांदन रस्ते खडीकरण डांबरीकरण करण्यात यावे .