माजरी कॉलरी ओपणकास्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर कामगार विकास परिवर्तन पैनलचा विजय

🔹जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांचे मार्गदर्शन

  ✒️मनोज कसारे (भद्रावती प्रतिनिधी)

भद्रावती (दि.13 फेब्रुवारी) :- माजरी कॉलरी ओपणकास्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक ११ फेब्रुवारीला पार पडली. या निवडणुकीत कामगार विकास परिवर्तन पैनलचा अकरा पैकी दहा जागेवर विजय झाला. सदर निवडणूक चुरशीची झाली. वेकोली कर्मचाऱ्यांनी या निवडणुकीला प्रतिष्ठेची निवडणूक बनविली. यात कामगार विकास परिवर्तन पैनल व जय माता दी प्रगती पैनल यांच्यात लढत होती. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांचे मार्गदर्शनातून झालेल्या या निवडणुकीत कामगार विकास परिवर्तन पैनलचे सर्वसाधारण गटातून सुभाष कळसकर, संजय झाडे, बाबा आस्वले, जितेंद्र श्रीखंडे, प्रवीण खाडे, महिला आरक्षित गटातून रंजिता झाडे, रत्नमाला नांदेकर, अनुसूचित जातीतील रुसी रामटेके, इतर मागासवर्ग प्रवर्गातून मनोज पारखी, विशेष मागासवर्ग प्रवर्गातून मोहन सोरते निवडून आलेत. तर जय माता दी पैनलचे सर्वसाधारण गटातून संजय बोढेकर निवडून आले. 

कामगार विकास परिवर्तन पैनलचे प्रवीण खाडे म्हणाले की, आधीच्या संचालक मंडळाने मनमानी सुरू केली होती. त्यांना या विजयातुन सभासद मतदारांनी धडा शिकविला आहे. आम्ही सभासद मतदारांना न्याय देवू.