ACC कंपनीला भरावे लागणार चोरी केलेला PF अंदाजे 4 ते 5 करोड 

✒️ संजय तिवारी चंद्रपूर(Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.15 ऑगस्ट) :- दि.14 आगष्ट 2024 रोजी सहाय्यक आयुक्त भविष्य निर्वाह निधी कार्यालय चंद्रपूर येथे सफेद झंडा कामगार संघटना जिल्हा चंद्रपूर चा माध्यमातून ACC चांदा सिमेंट कंपनी चा विरोधात 7 A मध्ये हेरिंग सुरु आहे .

गेल्या दहा वर्षांपासून ACC चांदा सिमेंट कंपनी व ठेकेदार यांनी पॅकिंग हाऊस 190 कामगार मेंटेनन्स डिपार्टमेंट 13 कामगार असे 203 कामगारांचा EPF चोरी ACC कंपनीतील मॅनेजमेंट व नितीन शर्मा ठेकेदाराने चोरी केला होता व तेथील कामगारांना बरोबर वेतन व अन्य सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी ACC कंपनीचा विरोधात. कंपनीतील कामगारांना घेऊन सुरेश मल्हारी पाईकराव यांनी आंदोलन केले होते.

या आंदोलनामध्ये ACC कंपनीतील कामगारांना पंधरा लाख रुपयांचा इंश्युरन्स, कामावरून ते घरी जाईपर्यंत, घरुन ते कामावर जाई पर्यंत अपघात झाल्यास 3.5 तीन लाख रुपयांचा इंश्युरन्स, ACC कंपनीतील सर्व कामगारांना त्यांचा मुला करिता 50% सुट, किमान वेतन विशेष भत्ता व अन्य सोयीसुविधा देण्याचा कंपनी मागण्या पूर्ण केल्या.

तसेच कंपनीतील 203 कामगारांचा PF चोरी संदर्भात नागपूर तर आता चंद्रपूर सहायक आयुक्त भविष्य निर्वाह निधी येथे मिटिंगा चालु असता. तीन कामगारांचा भविष्य निर्वाह निधी कार्यालया मार्फत अंतिम PF चोरी संदर्भात अहवाल सादर केला असता. 

तर तीन कामगारांचा 

2012 ते 2021 पर्यंत खालील प्रमाणे तीन कामगारांचा निघालेला EPF 

1) अशोक आसमपल्लिवार – 86870/-

2) शरद पाईकराव – 78736/-

3) दत्ता वाघमारे -75466/-

अशा यांचा EPF भरलेला नाही या PF ची व्याजा सहित गणना केली गेली तर जवळपास ACC कंपनीला 4 ते 5 करोड रुपयाचा फटका बसुन शकतो. 

पाईकराव यांनी सांगितले कि हे तर फक्त 203 कामगारांचा EPF आहे जर संपुर्ण ACC कंपनीतील जर चौकशी केली तर जवळ पास दोन हजार कामगार आहेत तर संपूर्ण कामगारांचा PF किती 

यावेळेस पाईकराव यांनी हे सुध्दा सांगितले कि सहाय्यक आयुक्त भविष्य निर्वाह निधी यांना आम्ही मागणी करु कि संपुर्ण ACC कंपनीतील कामगारांचा PF कंपनीने बरोबर भरणा केला आहे की नाही याची सुध्दा चौकशी करुन अहवाल सादर करावा. 

अन्यथा आम्हाला कामगार मंत्री संबंधित कार्यालयाचा दरवाजा ठोकठोकावे लागेल.