शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार धरणे आंदोलन 

Share News

✒️गजानन लांडगे महागाव (Yavatmal प्रतिनिधी)

महागाव(दि.18 फेब्रुवारी):- खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या अतोनात नुकसान मध्ये महागाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असताना व तसेच पिक विमा कंपनीच्या चार ढकल धोरणाला बळी पडला आहे पिक विमा न मिळाल्याने महागाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या अडचणीचा सामना करत आहेत .

तसेच सोयाबीन व कापूस या पिकांचे पडलेले दर यामुळे सुद्धा शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे अगोदर झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर चनाया पिकाला लागलेला मर रोग या सह निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्याला प्रशासनाच्या मदतीची अपेक्षा असतानी तालुक्यातील बहुता शेतकरी हे पीक विमा पासून वंचित आहेत तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा मदतीची प्रतीक्षा आहे .तसेच विद्युत महामंडळाने शेतकऱ्याच्या विद्युत पंपांचा विद्युत पुरवठा तोडण्याचा सपाटा चालू केल्यामुळे महागाव तालुक्यातील शेतकरी अडचनीचा सामना करीत आहेत .स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुढील मागण्या करण्यात .

1 .बुलढाणा येथे रविकांत तुपकर यांच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी येथील पोलिसांची चौकशी करण्याबाबत .

2 .यवतमाळ जिल्ह्यातील पंतप्रधान पिक विमा पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब पिक विमा मिळण्याबाबत

3 .जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना कुसुम योजना अंतर्गत सौर ऊर्जा पंप देण्याची मागणी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली तसेच 22 2 2023 रोजी महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालय महागाव येथे येऊन आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी हजर राहण्याचे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष मनीष भाऊ जाधव .

युवा जिल्हा अध्यक्ष शिवानंद राठोड .जिल्हा संघटक सचिन उबाळे .जिल्हा सचिव विशाल पवार .प्रमोद अडकिने महागाव तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना .सचिन शेळके कोश अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना महागाव ‘संदीप कदम . गुणवंत देशमुख .नंदू मस्के . गोकुळ राठोड यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share News

More From Author

कोळशाची वाहतूक थांबविण्याकरीता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल

धुमाकूळ घालणारा बिबट अखेर वन विभाग च्या पिंजऱ्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *