आज पासून भरणार भटाळा येथे शिव भक्ताचा मेळा

Share News

🔹26,27, व 28 तीन दिवसीय भव्य यात्रेचे आयोजन

🔸शेगाव पोलिसांचा राहणार चोख बंदोबस्त

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.26 फेब्रुवारी) – येथून जवळच असलेल्या तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले शिल्प ग्राम भटाळा येते दरवर्षी महाशिवरात्री निमित्त तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यासोबत तीन दिवसीय भव्य यात्रेचे देखील आयोजन दरवर्षी मोठ्या उत्साहाने केले जाते. यावर्षी देखील दिनांक 26, 27, व 28, असे तीन दिवसीय महाशिवरात्रीपासून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दिनांक 26 ला सकाळी 5 वाजता महापूजा, सकाळी 11 वाजता ह .भ. प. भेंडाळे महाराज यांचे जाहीर कीर्तन रात्र 9 वाजता भजन व रात्री 1 वाजता रथ मिरवणूक गुरुवार दिनांक 27 ला दुपार 12 वाजता ह.भ. प. माणूसमारे महाराज यांची जाहीर कीर्तन व रात्रौ 9 वाजता जागृती भजन शुक्रवार दिनांक 28 ल दुपारी 12 वाजता ह भ प खिरटकर महाराज यांचे काल्याचे किर्तन 2 वाजता दहीहंडी , व 3 वाजता महाप्रसाद वितरण.व 9 वाजता समाप्ती भजन.अश्या प्रकारे तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन विश्वरत्न मंडळ, भवानी देवी शंकर देवस्थान आणि विठ्ठल रुक्माई देवस्थान भटाळा यांच्याकडून करण्यात येत आहे याकरिता ग्रामपंचायत कमिटी भटाळा, तंटामुक्त समिती भटाळा, ग्राम दक्षता समिती व पोलीस स्टेशन शेगाव बूज. तथा समस्त गावकरी मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. विशेष म्हणजे भटाळा हे गाव वरोरा तालुक्यात येत असून चंद्रपूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध आहे इथे जगात सर्वात भव्य मोठे शिवलिंग असल्याचे इतिहासात नोंद आहे. ऋषी टाक, भवानी मंदिर , तसेच भोंड्या महादेव मंदिर आहे या मंदिरात भव्य मोठे शिवलिंग विराजमान आहे. या मंदिराला कळस नसल्याने हे मंदिर भोंडया महादेवाचे मंदिर म्हणून ओडखले जाते येथील मंदिर पुरातन काळातील आहे गावात तसेच गाव परिसरात अनेक कोरीव शिल्प असल्याने या गावाला शिल्पग्राम गाव म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुरातन विभागतर्फे या शिल्पाची तसेच पुरातन मंदिराची जतन करण्यासाठी दरवषी या गावाला लाखो रुपयाचा निधी प्राप्त होत असतो.

  1. भटाळा या गावात अनेक धार्मिक मंदिरे असल्याने इथे दररोज भाविक मोठ्या श्रध्देने येत असतात तर नवरात्र तसेच मर्गशिष महिन्याच्या दर सोमवरला जिल्यातील अनेक भाविक येथे मोठ्या संख्येने येत असतात. याच सोबत महाशिवरात्री या शुभपावन दिवशी तीन दिवस महाराष्ट्रातील भाविक हर हर महादेव च्या गजरात तसेच महादेवाचे गाणे म्हणत लाखो भाविक भक्त या ठिकाणी येत असतात.
Share News

More From Author

छावा चित्रपट कर मुक्त करा….खासदार प्रतिभा धानोरकर

आ.करण देवतळे यांचा सत्कार 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *