🔸प्रा. डॉ.अविनाश पंधरे अध्यक्ष तर नीरज आत्राम कार्याध्यक्षपदी निवड
✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा(दि.11 फेब्रुवारी) :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा वरोरा ची कार्यकारणी मान. माधव बावगे राज्य कार्याध्यक्ष म. अं. नि.स. प्राचार्य सविता शेटे राज्य विवेक वाहिनी विभाग कार्यवाह, पी. एम. जाधव जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आली.
वरोरा तालुका अध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश पंधरे, कार्याध्यक्ष नीरज आत्राम, उपाध्यक्ष प्रा. डॉ. अरविंद सवाने,उपाध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र पाटील, प्रधान सचिव परमानंद तिराणिक, बुवाबाजी संघर्ष विभाग कार्यवाह प्रा. तिलक ढोबळे, विविध उपक्रम विभाग कार्यवाह प्रा. आशिष येटे, वैज्ञानिक जाणीव शिक्षण प्रकल्प विभाग कार्यवाह प्रा. हेमंत परचाके, प्रशिक्षण व्यवस्थापन विभाग प्रमुख प्राचार्य अजय रामटेके,युवा सहभाग विभाग कार्यवाह प्रा. हर्षल चौधरी, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप कोहपरे (पञकार),
सोशल मीडिया प्रमुख ग्यानीवंत गेडाम, (पञकार),सल्लागार प्रा. डॉ. सुधाकर पेटकर, प्रा. डॉ. अरविंद ढोके, तर सदस्य धर्मेंद्र शेरकुरे, (पञकार), श्री नरेन्द्र कन्नाके,सचिन नाखले, प्रा. मनोहर चौधरी, प्रेमानंद नगराळे आदींची पदाननिहाय निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्व स्तरातून पदाधिकारी व सदस्यांवर शुभेच्छांचा तथा अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.