✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.10 फेब्रुवारी) :जी पोहा येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्ती चे भदंत ज्ञानज्योती महास्थविर संघ नायक संघारामगिरी आणि भिख्खू संघ यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीच्या अनावरण सोहळा संपन्न झाला.
दिनांक 9 फेब्रुवारी ला सकाळी 11वाजता पुज्यनीय भदंत ज्ञानज्योती महास्थविर यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीचा अनावरण सोहळा संपन्न झाला.त्यानंतर त्यांनी धामदेसणा दिली.त्यानंतर सेवानिवृत्त शिक्षक,प्राध्यापक तसेच बँक अधिकारी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.वशिष्ठ रामभाऊ पेटकर सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.संजय बोधे सर होते.प्रास्ताविक प्रवीण थुलकर तर आभार प्रदर्शन निलेश गायकवाड यांनी केले.