🔸आदिवासी माना जमात संघटन चंदनखेडा यांच्या उपक्रम
✒️भद्रावती (Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
भद्रावती(दि.10 फेब्रुवारी) :- तालुक्यातील ऐतिहासिक सातवाहनकालीन सांस्कृतिक नगरी चंदनखेडा येथील आदिवासी माना जमात संघटन चंदनखेडा येथील राजमाता माँ माणिका पेणढाणा च्या प्रांगणात ७,८ व ९ फेब्रुवारी रोजी तिन दिवसीय समाज प्रबोधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी सकाळी परिसर स्वच्छतेने सुरुवात करुन नंतर सायंकाळी समाज संस्कृती परंपरेनुसार मुठपुजा,खन, व डायका पार पडल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी परिसर स्वच्छतेने सुरुवात दुपारच्या सत्रात रांगोळी स्पर्धा, महिलांच्या विविध क्रिडा स्पर्धा,उखाणे, समाजाविषयी चर्चा सत्र पार पडले, सायंकाळी आदिवासी नुत्य स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.
९ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ला परिसर स्वच्छता करून सकाळी ९ ला वाजेपासून गावातून जयघोषाच्या गजरात प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर दुपारच्या सत्रात समाज प्रबोधन कार्यक्रमास सुरुवात झाली.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन लताताई नन्नावरे यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राकेश घरत सामाजिक कार्यकर्ता,माना जमात विद्यार्थी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकिशोर जांभुळे, नंदु आत्राम, ग्रामपंचायत सदस्या प्रतिभाताई दोहतरे,आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठलजी हनवते यांनी केले.संचालन देविदास चौखे यांनी केले तर आभार अनिल हनवते मानले.कार्यक्रमाला आदिवासी समाजातील बंधु – भगीनी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजातील युवक,युवती, महिला, पुरुष बालगोपाल, गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.