🔸शेकडो गावात स्वच्छता अभियानाला सुरुवात
✒️शिरीष उगे भद्रावती(Bhadrawati प्रतिनीधी)
भद्रावती (दि.6 फेब्रुवारी) :- पंचायत समिती, भद्रावती अंतर्गत ग्राम पंचायत नंदोरी बू. येथे शासन निर्णयानुसार महा स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करून शेकडो गावात नागरिकांनी ,पदाधिकारी,अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात झाडु घेऊन स्वच्छता अभियान राबविले.
सदर अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विरेंद्र रजपूत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत तांबे, सहाय्यक गट विकास अधिकारी बंडू आकनुरवर, पशु विस्तार अधिकारी डॉ. बियानिया, विस्तार अधिकारी पारखी, प्रणाली भागवत, कृषी अधिकारी डाखरे, मुख्याध्यापक ढोरे,ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, उपस्थीत होते. यावेळी जि. प. शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, आंगणवाडया, मंदिर व सर्व परीसर स्वच्छ करून ओला व सुका कचरा वेगवेगळा घंटागाडी मध्ये जमा करून विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी राज्य शासनाच्या निर्देशानुसार महास्वच्छता अभियानात सर्वानी सहभागी होऊन गावागावात अभियान राबविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले होते.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी नुतन सांवत यांच्या मार्गदर्शनात गावागावात श्रमदानातून शेकडो नागरिक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी हातात झाडु घेऊन महास्वच्छता अभियानात सहभागी घेतल्याबद्दल कृषी विकास अधिकारी विरेंद्र रजपूत, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी मनोगतात आभार व्यक्त करीत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी गट विकास अधिकारी व सहा. गट विकास अधिकारी यांनी जि.प. शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत हितगुज करून मार्गदर्शन केले.तसेच तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.