✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.2 फेब्रुवारी) :- तालुक्यातील कोसरसार येथे आज पासून संगीतमय श्रीमद भागवत तथा नामसकीर्तना चे आयोजन विठ्ठल मंदिर देवस्थान कोसरसार तथा ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ कोसरसार यांच्या वतीने आयोजन केले आहे.
३ फेब्रुवारी पासून सकाळी पहाटे ५ ते ६ काकडा भजन ६ ते ७ ज्ञानेश्वरी पारायण ९ ते ११ भागवत कथा ह.भ.प जगणं महाराज नेहारे यांच्या वानीतून पठण होणार आहे दुपारी २ ते ५ भागवत कथा ६ ते ७ हरिपाठ नंतर लगेच ९ ते ११ नांमसकीर्तन कीर्तन होणार आहे ३ फेब्रुवारी ह.भ.प संतोष महाराज चांभारे अकोला ४ फेब्रुवारी ह.भ.प प्रशांत महाराज आंबडकर वर्धा ५ फेब्रुवारी ह.भ.प रुपेश महाराज तळवेकर आळंदी ६ फेब्रुवारी ह.भ.प खुशाल महाराज वैदय पेंढरी नागपूर यांचे नाथांचे भारुड
७ फेब्रुवारी गजानन महाराज कपिले हिंगणघाट ८ फेब्रुवारी ह.भ.प रोहन महाराज मेटकरी नदेश्वर जिल्हा सोलापूर ९ फेब्रुवारी ह.भ.प गुरुवर्य नामदेव महाराज वासू जुनोना वर्धा १० फेब्रुवारी ला काल्याचे कीर्तन ह.भ.प भागवताचार्य जगणं महाराज नेहारे यांचे होईल त्या नंतर लगेच महाप्रसादाला सुरवात होईल. या कार्यक्रमाचा प्रचक्रोशीतील नागरिकांनी आस्वाद घ्यावा असे आयोजन मंडळीने आवाहन केले आहे.