🔸बिटस्तरीय स्पर्धेत वनोजा शाळा ठरली होती अव्वल
✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि .1 फेब्रुवारी) :- तालुक्यातील वनोजा येथील जि. प. प्राथमिक शाळेतील विशाखा शंकर पिंपळकर हिने वैयक्तिक नृत्य स्पर्धा प्रकारात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे आता ती जिल्हास्तरावर नेतृत्व करणार आहे. वरोरा बिटाच्या बिटस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेतही वनोजा शाळा अव्वल ठरली होती. त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
वरोरा बीटाच्या बिटस्तरीय स्पर्धा परसोडा येथे पार पडल्या होत्या. यात वैयक्तिक नृत्य स्पर्धेत विशाखा पिंपळकर प्रथम, नक्कल आणि वैयक्तिक गायन या प्रकारात यश श्रीकृष्ण बावणे द्वितीय आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला होता.
वरोरा बिटाचा क्रिडा आणि सांस्कृतिक महोत्सव नुकताच परसोडा येथे पार पडला होता. या स्पर्धेत २४ शाळेनी आपला सहभाग दर्शविला. या सांस्कृतिक स्पर्धेत विशाखा पिंपळकर, यश बावणे, अधिरा कुळसंगे, भावेश उताणे, चैतन्य धारणकर, यिशिका गेघाटे, आरती मोडक, प्रज्वल आवारी खुशी खारकर, दिशांत गमे, शिवण्या बोधाने आदींनी सहभाग घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक शारदा उमरे, विजया शेंडे यांनी मार्गदर्शन केले.
वरोरा तालुक्याचा क्रिडा आणि सांस्कृतिक महोत्सव खेमजई येथे पार पडला. यात वैयक्तिक नृत्यात विशाखा पिंपळकरनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सरपंच शालूताई उताणे, उपसरपंच सचिन बुरडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे देवाजी बोधाने, संध्या बदखल, शारदा कुळसंगे, निलीमा पिंपळकर, सुचिता धारणकर, देविदास गमे, श्रीकृष्ण बावणे, करिष्मा गेघाटे, मिरा चौधरी, रंजना गेडाम, गिता गेघाटे, साधना गारघाटे, जया बावणे, मुख्याध्यापक शारदा उमरे, विजया शेंडे, मंदा खारकर, मंगेश लखमापुरे, राजू उताणे, दिलीप गमे, किशोर मोडक, मंगेश गेघाटे, गजानन चौधरी, दिलीप उईके किसन गमे, रुपेश माणुसमारे, सुरेश गमे, विनोद खिरटकर, भालचंद्र गाणफाडे, विजय गेघाटे, महेंद्र उताणे, तसेच ग्रामवासियांनी अभिनंदन केले आहे.