अनुसया वृद्ध महिलेच्या अंतविधित वानराने लावली हजेरी

Share News

✒️शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.30 जानेवारी) :- वरोरा तालुक्यातील टेंमूर्डा नजीक असलेल्या पिपंळगाव येथील विजय मारोती धवणे यांच्या मातोश्री अनुसया मारोती धवणे यांचं आज बुधवार दि. 29 जानेवारी रोजी वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. आईचं निधन झाल्यामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. दुपारी सगळे नातेवाईक जमा झाले. अनुसया यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली.

अनुसया यांचं पार्थिव स्मशानभूमीत नेत असताना साक्षात हनुमानजीचे रूप समजले जाणारे वानर त्यांच्या घरी अनुसया यांच्या पार्थिवाला न्याहाळून त्यांना नमस्कार केला. हे वानर स्मशान भूमीपर्यंत पोहचलं. सगळ्यांना वाटलं आता हे वानर तिथून निघून जाईल. पण त्या वानराने मृतदेहाच्या जवळ जाऊन बांगड्या फोडल्या, डोक्यावरील पदर काढला. मृतदेहाला चक्क मिठी मारून डोळ्यावरील चष्मा काढला. त्यानंतर ते नातेवाईकांसोबत त्यांच्या घरापर्यंत आले आणि नंतर निघून गेलं.

 अनुसया यांचे पती मारुती धवणे यांचं 20 वर्षा पूर्वी निधन झालं होतं. त्यांच्या पतीचे नाव मारुती धवणे होतं. आज अनुसया यांच्या अंत्यविधीच्या वेळी बजरंग बलीचे रूप समजले जाणारे वानर मृत्यूनंतर त्यांना भेटायला यणे हा योगायोग की चमत्कार असा प्रश्न उपस्थित सर्वांनाच पडला.

Share News

More From Author

वन विभागाच्या आशीर्वादाने चालते रेतीची तस्करी

अवैद्य रेती तस्करी करणाऱ्या तस्कराचा शासकीय अधिकाऱ्याला धक्काबुक्की तसेच शिवीगाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *