✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बूज(दि.28 जानेवारी) :- येथून जवळच असलेल्या चारगाव खुर्द येथे आज खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत विविध कामाचा शुभारंभ करण्यात आला. येथील ग्राम पंचायत चे सरपंच श्री राजुभाऊ चिकटे यांच्या विशेष प्रयत्नाला आज यश मिळाले असून ग्राम वासियांच्या सुख सोयीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते जन सेवेत झटत आहे. शिवाय जनतेला सुख सोई उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र कष्ट मेहनत घेत असतात. गेल्या काही दिवसापासून गावाचा आराखडा लक्षात घेऊन गाव विकासचे कामे हाती घेतले. करिता या विकास कामाला आज मंजुरी मिळून आज या कामाचा शुभारंभ खासदार प्रतिभाताई धानोरकर व येथील सरपंच श्री राजूभाऊ चिकटे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहाने शुभारंभ करण्यात आला.
यात बाजार वाडीत परिसरात गट्टू रोड बांधकाम 12 लाख रु. , श्री विठ्ठल चौखे दिलीप जुनारकर यांच्या घरापर्यंत रोड चे बांधकाम किंमत 12 लाख रुपये. चारगाव खुर्द येथील अंगणवाडी क्र.2 साठी सवरक्षण भिंत किंमत 5 लाख रुपये. श्री गुलाब एकरे ते श्रीकांत पेचे ते कलावती पेटकर यांच्या शेतापर्यंत खडीकरण करणे किंमत 17 लाख रुपये. श्री कमलकर पावडे ते सुरेश क्षीरसागर यांच्या शेतापर्यंत खडीकरण करणे किंमत 14 लाख रुपये , श्री पुरुषोत्तम पावडे ते प्रमोद खामनकर यांच्या शेतापर्यंत खडीकरण करणे किंमत 25 लाख रुपये, श्री विकास हेकाड ते पंकज पेचे यांच्या शेतापर्यंत खडीकरण करणे किंमत 25 लाख रुपये , इत्यादी विविध कामाचा शुभारंभ यावेळी मोठ्या उत्साहाने पार पडला . यावेळी गावचे सरपंच श्री राजूभाऊ चिकटे , योगेश खामनकर , मनोहर क्षीरसागर , अभय धोबे , प्रकाश कष्टी , बबलू तितरे , व अन्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात अनेक विकास कामाचे भूमिपूजन सोहळा तसेच शुभारंभ झाल्याने गावातील नागरिकांमध्ये तसेच शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.