✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू(दि .28 जानेवारी) :- येथून जवळच असलेल्या व वरोरा तालुक्यातील अकोला नं.- २ या गावातील श्री गुरुदेव सेवा मंडळ द्वारा आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सप्ताह निमित्त कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी शेगाव बु. यांच्याकडून कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या दोन प्रयोगशील शेतकरी बांधवांचा शाल ,श्रीफळ व ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये सेंद्रिय शेती,नैसर्गिक शेतमाल उत्पादक शेतकरी श्री नथ्थुजी गारघाटे, अकोला नं.२ व नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून कृषी उत्पादनात भर टाकणारे,जवस उत्पादक शेतकरी, चिकु उत्पादक प्रयोगशील शेतकरी श्री संदीप थुल,राळेगाव यांचा मंडळ कृषी अधिकारी श्री विजय काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर महोत्सवात मार्गदर्शन करताना श्री विजय काळे यांनी नैसर्गिक शेती मिशन ची आवश्यकता,नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत निवडलेल्या गावात ग्राम कृषी विकास समिती स्थापना इत्यादी विषयावर सविस्तर माहिती उपस्थित गावकऱ्यांना दिली.
“””शेतकऱ्याच्या पोरा तू घडायला शिक !
थेंब थेंब पाणी जिरवायला शिक !
कण कण माती अडवायला शिक !
झाडे चहुकडे वाढवायला शिक !
शेतकऱ्याच्या पोरा तू घडायला शिक !
पिकाची आखणी करायला शिक!
बियाणं घरचंच पेरायला शिक !
पीक पालटून घ्यायला शिक!
शेतकऱ्याच्या पोरा तू घडायला शिक !
शेणकाला रबडी घालायला शिक !
जिवाणूचे पोषण करायला शिक !
गोधन तेवढं जपायला शिक !
शेतकऱ्याच्या पोरा तू घडायला शिक !
उपरोक्त ओळीच्या माध्यमातून सेंद्रिय शेती ,नैसर्गिक शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सदर कार्यक्रमास कृषी सेवक श्री वैभव साळवे ,बाळासाहेब पडवे आष्टा, ईश्वर घानोडे सावरी, प्रा. संजय बोधे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अशोकजी भीमटे,माजी सरपंच यांनी केले.