कुत्र्याच्या हल्ल्यात हरिनाचे पिल्लू ठार

✒️भद्रावती (Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

भद्रावती (दि.20 जानेवारी) :- आयुध निर्माणी चांदाच्या जंगल परिसरातून भटकलेल्या हरिणाच्या पिल्लास पाळीव कुत्र्यांनी हमला करून ठार केल्याची घटना रविवार दि. १९ जानेवारीला पहाटे ५ वाजताच्या सुमारास शहरातील गौतम नगरात उघडकीस आली. 

  या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनरक्षक धनराज गेडाम यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हरिनाच्या पिल्लास वन विभागाच्या आयुध निर्माणी परिसरातील आरक्षित नर्सरी जवळील जमिनीत पुरविण्यात आले. सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, पवन मांढरे, किशोर मडावी, अनिल शेंद्रे यांनी केली.