🔸महसूल विभाग तसेच पोलीस प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष
✒️ चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.19 जानेवारी) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या आष्टा पारोधि या नदीतून सर्रास पणे बोरगाव धांडे या गावातील धांडे नामक रेती तस्कर गेल्या अनेक वर्षापासून गेल्या अनेक दिवसापासून सर्रासपणे आपले तीन ते चार ट्रॅक्टर रेती तस्करी करून वाहतूक करीत असल्याची घटना गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे परंतु या नदी घाटातील कसल्याही प्रकारचा लिलाव न झाल्याने महसूल विभाग यांच्या निदर्शनास येत असलेल्या खनिज संपत्तीत बोरगाव येथील धांडे हा इसम तस्करी करून गोर गरीब मजुराची आर्थिक फसवणूक करून त्यांच्याकडून मिळेल ती रक्कम वसूल करून आपली तटपुंजि जमा करीत आहे तेव्हा महसूल विभागाची संपत्तीत मोठ्या प्रमाणात चोरी होत असून महसूल विभागाला लाखो करोडो रुपयाचा हा इसम चुना लावत आहे . त्यामुळे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा लाखो करोडो रुपयाचा महसूल शासकीय तिजोरीत जमा व्हावा याकरिता येथील वाळू तस्कर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिक तसेच जनता मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत.
सविस्तर असे की आष्टा पारोधी हे गावे भद्रावती तालुक्यात येत असून येथील तहसीलदार हे फक्त बसल्या खुर्चीवरच बघायची भूमिका घेत असतात याचा फायदा बोरगाव धांडे वाळू तस्कर फायदा घेत अहोरात्र जागून आपले ट्रॅक्टर च्या माध्यमातून दररोज 15 ते 20 ट्रॅक्टर रेती उपसा करून महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून शासनाला लाखो रुपयाचा चुना लावत गरीब जनतेची आर्थिक लुबाडणूक करीत असल्याचे महा भयानक दृश्य गावातील नागरिकांनी सांगितले.
तेव्हा शासनाची फसवणूक यास गोरगरीब जनतेची आर्थिक पिळवणूक थांबवन्यासाठी यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे . विशेष म्हणजे गावकऱ्यांच्या मते बोरगाव धांडे येथील वाळू तस्कर हा स्वतःला राजकीय पक्षा च नेता कार्यकर्ता दाखवत शासकीय अधिकारी यांना धमकवित असल्याचे देखील सांगण्यात आले .
तेव्हा शासकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी यांच्या वर राजकीय पक्षा च अधिकार गाजवत असल्यास त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. करिता संबंधित महसूल विभाग भद्रावती तसेच पोलीस स्टेशन अधिकारी शेगाव बूज. यांनी जातीने लक्ष केंद्रित करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.