🔸आगीत लाखो रुपयांचे नुकसान
🔹धामणी गावातील घटना
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.18 जानेवारी) :- स्थानिक शेगाव बुद्रुक येथून जवळच असलेल्या व भद्रावती तालुक्यात येत असलेल्या धामणी या गावांमध्ये दिनांक 15 जानेवारी भर दुपारी शेतामध्ये असलेल्या गोठ्यावरून गेलेली विद्युत तार गळून पडल्याने गोट्याला अचानक आग लागून यात येथील शेतकरी श्री मेघराज बालाजी लडके राहणार धामणी यांच्या गोठ्याला आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे शिवाय गावकऱ्यांच्या सहकार्याने तसेच बुद्धीने अनेक साहित्य यासह जनावरांचे प्राण वाचले.
सविस्तर अशी की दिनांक 15 जानेवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास्स येथील पीडित शेतकरी श्री मेघराज लडके यांच्या शेतामधून यांच्या कोठ्यावरून विद्युत तार गेल्या अनेक वर्षापासून वाहत आहे या संदर्भात या शेतकऱ्यांनी अनेकदा महावितरण कार्यालय यांना भेट देऊन सविस्तर सांगून या तारा बाजूंना घ्याव्यात अशी बोलणे सुद्धा केली परंतु महावितरण कर्मचारी तसेच यांचे मुख्य अधिकारी हे यांनाच धमकावीत तुम्हीच हे तार अलग करणार असे सांगत होते.
परंतु हे काम महावितरण कार्यालयाचे असल्याने येथील ज्युनियर इंजिनीयर महावितरण कार्यालय हे उलट यांना धमकावीत होते. व अखेर गोठावरून जात असलेले चार विद्युत जिवंत तारा पैकी दोन तार गोठावर कोसळले व गोट्यामध्ये असलेले सर्व साहित्य यासोबत जनावरांचा चारा , शेती उपयोगी उपकरणे, यात नागर , वखर, तिफण, पाणी करण्याचे प्लास्टिक पाईप , तसेच ट्रॅक्टरचे रोटावेटर, व अन्य साहित्य जळून निकृष्ट झाल , यात पीडित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले त्यामुळे या पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला तात्काळ देण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यासह शेतकऱ्यांनी केली आहे अन्यथा येथील शेतकरी आंदोलन तसेच उचित पाऊल घेण्यासुद्धा मागे सरणार नाही अशी धमक यावेळी येथील पीडित शेतकरी श्री मेघराज लडके यांनी दिली आहे .
सदर शेतकरी दुःखी अवस्थेत असलेला असला तरी महावितरण कार्यालय चंदनखेडा येथील ज्युनिअर इंजिनियर तसेच येथील कर्मचारी यांना उद्धट भाषेत बोलून त्यांना अपमास्पद वागणूक दिली व शेतकऱ्यांना तेथून हलकवण्याचा प्रयत्न केला परंतु पीडित शेतकरी दुःखी असल्याने आपले डोळे पुसद मागल्या पावली परत आला.
केव्हा या पीडित शेतकऱ्यांची विशेष दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मोका चौकशी करून शेतकऱ्यांचे झालेल्या लाखो रुपयाची नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी यासोबत महावितरण कार्यालय येथील कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील पीडित शेतकरी तसेच गावकऱ्यांनी केली आहे यात पीडित शेतकऱ्यांचे चार ते पाच लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे पीडित शेतकऱ्यांनी प्रतिनिधी यांच्याशी सांगितले.