विदर्भ कोकण ग्रामीण बँक चंदनखेडा च्या खातेदाराला PMJJBY चा मोबदला

🔹फक्त 436 रुपयांत 2 लाखांचे विमा संरक्षण

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.15 जानेवारी) :- १७ आक्टोबर २०२४ ला .सौ.कलावती परसराम कुळमेथे यांची हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.वारसान असलेले त्यांचे पति श्री.परसराम भाऊराव कुळमेथे हे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे खातेदार आहेत असे कळताच बँकेच्या शाखा अधिकारी एस.के.फुलझेले साहेबांनी या बद्दल स्वतः दखल घेतली.

लाभार्थी म्हणून असलेले परसराम भाऊराव कुळमेथे यांना PMJJBY ची विमा योजना त्यांच्या पत्नीच्या नावाने वर्षांपूर्वी स्वयंचलित केली होती त्यामध्ये वारसनाला दोन लाख रुपये मोबदला मिळत असतो असे शाखाधिकार्यांनी सांगीतले.

माहीती मिळताच पतिने कागदपत्रे बँकेत सादर केली आणि दि .५ डिसेंबर २०२४ ला प्रस्ताव तयार करून शाखाधिकारी यांनी मेल द्वारे PMJJBY च्या सांकेतकावर पाठवले . दिलेल्या पतिच्या बचत खात्यावर दि 30 डिसेंबर 2024 ला 200000 रुपयांची विमा राशी पतिच्या बचत खात्यावर जमा झाली.