वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

🔹चारगाव बिटातील मानकापूर येथील घटना 

🔸कक्ष क्रमांक ३०४ राखीव वन 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.14 जानेवारी) :- मानकापूर येथील शेतकरी स्वत:चे गुरे घेऊन चराईसाठी रिंगदेव तलावात गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवला.आरडाओरड केली असता वाघ पळून गेला. सुदैवाने प्राण वाचले. वनविभागाला गावकऱ्यांनी माहीती दिली.जखमी व्यक्तीला घेऊन बिटाचे वनरक्षक दवाखान्यात भरती केले.ही घटना आज दुपारच्या वेळी २.१५ वाजेच्या दरम्यान घडली. जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव प्रभाकर विस्तारी वेटे(५२) रा.मानकापूरअसे आहे

   तालुक्यातील चारगाव बिटात रिंगदेव तलाव आहे.कक्ष क्र.३०२ येथील जंगलात प्रभाकर वेटे हे स्वतः चे बैल ढोर पाळीव जनावरे घेऊन गेले होते. बैल चराई करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढविला. यात तो शेतकरी गंभीर जखमी झालाआहे.मानेला मोठ्या जखमा असून छातीवर पंजाचे खुणा आहेत.जखमीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुढील उपचारकरीता सामान्य रुग्णालयात गडचिरोली येथे हलविण्यातआले.

वनविभागाने जखमी व्यक्तीला१० हजार रुपये तात्काळ आर्थिक मदत दिली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक परमेश्वर खेळकर, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्रअधिकारी विनोद धुर्वे, क्षेत्र सहाय्यक अनिल मेश्राम पेंढरी,, विकास उईके वनरक्षक , आखाडे वनरक्षक आदींनी मदत केली .