आधुनिक नव तंत्रज्ञान स्विकारून शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसाय म्हणुन पहावे-जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अजीत जैन

🔹विदर्भातील चाळीस पत्रकारांनी केला कृषी अभ्यास दौरा

✒️चिमूर(Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चिमूर(दि .3 जानेवारी) :-शेतकरी केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेतीकडे पाहतात, मात्र वाढती महागाई लक्षात घेवुन शेतीला उदरनिर्वाहाचे साधन म्हणुन सिमीत न ठेवता शेतीकडे व्यवसायीक दृष्टीकोनातून पाहण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया प्रगती करायची असेल तर व्यवसाय म्हणुन शेतीकडे बधावे लागेल व त्या पध्दतीने शेती करावी लागेल. शेतीसाठी लागणारा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन कसे वाढेल यावर शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे तरच शाश्वत शेती करता येईल. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळावे लागेल. त्यासाठी शेतीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल असे मत जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अजीत जैन यांनी व्यक्त केले.

विदर्भातील ४० पत्रकारांनी जळगांव येथील जैन हिल्स येथे सुरु असलेल्या कृषी महोत्सवात सहभाग घेतला. त्यावेळी अजीत जैन पत्रकारांशी संवाद साधत होते. जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री स्व. भवरलालजी जैन यांच्या जयंतीनिमित्य हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचे शेतकऱ्यांसाठी आयोजन केले आहे. दिनांक १४ डिसेंबर ते १४ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या कृषी महोत्सवात विदर्भातील प्रिंट, पोर्टल, डिजीटल माध्यमांचे प्रतिनिधीनी कृषी अभ्यास करण्याचे दृष्टीने या दौऱ्याचे आयोजन केले होते.

वातावरणातील बदलाचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. दिवसेंदिवस शेतजमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटत आहे. कमी जागेत व कमी पाण्यात अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर शेतात आधुनिक नव तंत्रज्ञान शेतकऱ्यांना स्वीकारवेच लागेल. पारंपारीक पध्दतीने शेती करण्याचे दिवस आता संपले आहे. जमिनीच्या मशागतीपासुन ते पिक लागवड व उत्पादनापर्यंत यांत्रिकीकरण झाले आहे. आपली शेती हायटेक करायची असेल तर बदल हा करायलाच पाहीजे.

तो निसर्गाचाच नियम आहे. याचा विचार करून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळावे लागेल. त्यासाठी शेतीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड घ्यावी लागेल. पारंपारीक पध्दतीकडून आधुनिक शेतीची कास आता शेतकऱ्यांना धरावी लागेल, तरच शेतीतुन उत्पन्न वाढ शकेल. शाश्वत शेती करण्यासाठी व उत्पन्नाची शाश्वती मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी वापर करावा. शेतीतील जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान जैन इरिगेशनने हायटेक शेतीचा नवा हुंकार या उपक्रमाव्दारे कृषी महोत्सवाच्या माध्यमातून केला आहे.

या पत्रकारांच्या अभ्यास दौऱ्यात आनंद आंबेकर, देवनाथ गंडाटे, सुरेश डांगे, बी. संदेश, प्रविण ननेवार, तुकाराम लुटे, राजु कापसे, प्रा. राजु रामटेके, रामदास हेमके, नितीन पाटील, संजय नागदेवते, सुरेश बिरामवार, दिलीप घोडमारे, रवी खाडे, संजय वालके, अनिल नौकरकर, दिलीप नवडेटी, दयालनाथ मानवटे, राम वाडीभस्मे, दिलीपकुमार इंगोले, हर्षपाल मेश्राम, पंकज चौधरी, सुगत गजभीये, शेखर गजभीये, कैलास निगोट, राजकिशोर गुप्ता, धनगीपाल मुझबैले, सचिन डेंगरे, नितीन येरुणकर, लेकराम ढंगे, कपील वानखेडे, पवन वानखेडे, व्ही. पदमाकर, विलास उके, प्लॅश गजभीये, नाना केमे आदींचा समावेश होता.