🔹सालोरी शेतामधील घटना
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon bu प्रतिनिधी)
शेगाव बू(दि.2 जानेवारी) :-
पोलीस स्टेशन शेगाव गुन्हा रजिस्टर क्रमांक 01/2025 कलम 105 भारतीय न्याय संहिता 2023 चा गुन्हा दिनांक 1/1/2025 रोजी नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे राजेंद्र महादेव शिरपूरकर राहणार सालोरी यांनी तक्रार दिली की त्यांचा भाऊ मृतक नामे संजय मारुती शिरपूरकर राहणार सालोरी हा अरुण शेरकुरे याचे शेतात सालगडी म्हणून काम करीत होता तो दिनांक 29 /12/ 2024 रोजी रात्र 21.00 वाजता दरम्यान मालकाच्या शेतात गेला असता तो घरी परत आला नाही.
त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने त्याचे संबंधात मृतकाच्या नातेवाईकांनी दिनांक 1/1/25 रोजी पोस्टेला मिसिंगबाबत माहिती दिली तेव्हा मृतकाच्या शोध दरम्यान मृतकाचा मृतदेह हा गुन्ह्णयातील आरोपी मारोती नागोसे राहणार सालोरी यांच्या शेतात इलेक्ट्रिक करंट लावून असलेल्या ताराला जवळ मृत अवस्थेत मिळुन आला आरोपी यांनी त्याचे शेतातील पिकाच्या संरक्षणाकरिता शेतात असलेल्या मीटर मधून ताराने इलेक्ट्रिक करंट घेऊन शेताच्या भोवताल लावलेल्या ताराला करंट लावून ठेवला होता.
मृतक हा त्या ताराला चिटकून मरण पावला प्राप्त तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार सपोनि योगेंद्रसिंग यादव यांचे मार्गदर्शनात पो उपनि महेंद्र शहारे पोस्ट शेगाव हे करीत असून गुन्ह्यात आरोपीस अटक करण्यात आली आहे.