✒️सुनील भोसले कोल्हापूर(Kolhapur प्रतिनिधी)
कोल्हापूर(दि .31 डिसेंबर) :- येथील शाहू सांस्कृतिक भवन येथे सुप्रसिद्ध अभिनेते संजय खापरे यांच्या शुभहस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे संदीप राक्षे, भोसरी यांना ग्रेट महाराष्ट्र सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, स्वप्नपूर्ती फाऊंडेशन कोल्हापूर, जिद्द फाऊंडेशन कोल्हापूर, वेद फाऊंडेशन इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यामाने आई महालक्ष्मी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक मान्यवर उपस्थित होते, महिलांची उपस्थिती लक्षणीय होती अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डाॅ बी एन खरात हे होते या कार्यक्रमाचे आयोजन पुनम मोरे, रजनी शिंदे, गीतांजली डोंबे यांनी केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपेश पाटील यांनी केले होते.