✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)
पुणे(दि.30 डिसेंबर) :- रुग्णवाहिका ही अत्य आवश्यक सेवेमध्ये मोडत असून त्याच्यावर वेग मर्यादाच नियंत्रण आणले आहे.
आरटीओच्या ई प्रणाली नियमामुळे रुग्णवाहिकाच्या वेगाला ला लगाम लागणार आहे. या लगामामुळे रुग्णाचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रुग्णांना नेताना रुग्ण सिरीयस कंडिशन होण्याचे किंवा मृत्यूचे प्रमाण वाढणार आहे. या घडणाऱ्या दुर्घटनेला आरटीओ प्रशासन जबाबदार राहील. त्याची नोंद प्रशासनाने घ्यावी. कारण पेशंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना रुग्णवाहिका वेग इ चलन दंड आकारत आहे. आरटीओ प्रशासनने रुग्णवाहीका साठी लागणारे इ चलन दंड बंद करण्यासाठी गांभीर्याने विचार करावे. अशी मागणी महाशक्ती ऍम्ब्युलन्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटनेने केली आहे.
“रुग्णवाहिकेला वेग मर्यादा लावल्याने रुग्ण हॉस्पिटला पोहोचायला उशीर होईल.त्या मुळे रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो.रुग्ण दगवू शकतो. त्या मुळे आम्ही रुग्णाच्या जीवाशी खेळू शकत नाही आम्ही रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी आमची जीवाची बाजी पणाला लावत असतो. वेग मर्यादेचा रुग्णवाहिकेला दंड आकरण्याच्या नियमाचा निषेध करतो. प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन जर निर्णय बदलला नाही तर भारतभर रुग्णवाहिकेचे चालक मालक रस्त्यावर उतरून रुग्ण सेवा भारतभर बंद करतील . याची दखल शासनाने व आरटीओ प्रशासनाने घ्यावी”.
मुकुंद कांबळे रायगड कार्याध्यक्ष महाशक्ती ऍम्ब्युलन्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य