✒️धर्मेंद्र शेरकुरे वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा(दि.29 डिसेंबर) :- महाराष्ट्राची संस्कृती संताच्या विचाराने नटवलेली असून वारकरी संप्रदाय भजन किर्तन यात तल्लीन हाेत.धार्मिक भावनेचे गोडवे व समाज प्रबोधन भजन कीर्तनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेत रुजले आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भजनाच्या माध्यमातून क्रांती घडवून आणली असून मोठ्या प्रमाणात गावागावात भजन मंडळी दिसून येत होती. मात्र आधुनिक बदलत्या युगात भजन मंडळे मोडकळीस आल्याने मोजकेच भजन मंडळ भजनाचा ठेवा जपत आहेत.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 56 वा पुण्यस्मरण महोत्सव अर्जुनी गावात 25 ते 29 डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आला असुन आज सकाळी गावातील मुख्य रस्त्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा धारण करत भजनदिंडी काढण्यात आली यामध्ये गावातील महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मूर्ती सजावट, करण्यात आली.
दिंडीमध्ये सहभाग झालेल्या नागरिकांना गावातील चौकात आलुभात,घुगरी, शिरा वाटप करण्यात आला, दिंडीमध्ये परिसरातील कोकेवाडा,वायगाव, किनारा, चंद्रपूर येथील इंदिरानगर येथील भजनदिंडीने सहभाग दर्शविला होता.
आजच्या घडीला तुकड्यादास महाराज प्रेरणेतून नित्यनेमाने सफेद खादी कुर्ता , धोतर व भगवी टोपी परिधान करून गुरुदेव भजन मंडळ,वारकरी संप्रदाय भजनाची परंपरा जपत आहे.काल्याचे किर्तन ह.भ.प. संजय गजभे महाराज मांडवा यांनी केले, काल कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने करण्यात आली.