श्रध्देय बाबा आमटे यांच्या जयंती निमित्य नंदोरी ( बु. ) येथे आज भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिर

🔸स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांचा संयुक्त उपक्रम

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.26 डिसेंबर) :- तालुक्यातील नंदोरी (बु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे  थोर समाजसेवक  बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त  दि. २६ डिसेंबर २०२४ रोज गुरुवार ला  सकाळी १० ते २ वाजेपर्यंत स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. याप्रसंगी ट्रस्टच्या वतीने शंभर जेष्ठ नागरिकांना आरोग्य तपासणी कार्डचे मोफत वितरण करण्यात येईल. या शिबिरात परीसरातील  नागरिकांसह नंदोरी ( बु. ) येथील जि.प. उच्च प्राथ. शाळा व महात्मा ज्योतीबा फूले येथील विद्यार्थांची सुध्दा मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल.

    या निमित्य शिबिराच्या उद्घाटनिय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 

 स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेचे माजी अध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे ,कार्यक्रमाचे उद्घाटक वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज खुजे, प्रमुख अतिथी नंदोरी ( बु. ) ग्रा.पं.सरपंच मंगेश भोयर, नंदोरी ( बु. ) ग्रा.पं. उपसरपंच उषा लांबट,स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट च्या कोषाध्यक्ष सुषमाताई शिंदे, पं.स. भद्रावतीचे माजी  सभापती धनराज विरुटकर, वरोरा कृ. उ . बा.समितीचे उपसभापती जयंत टेंमुर्डे, भद्रावती कृ. उ . बा.समितीचे उपसभापती अश्लेषा भोयर ,भटाळीचे ग्रा.पं. सरपंच सुधाकर रोहनकर, चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सचिन दगडी, वरोराचे डॉ. विजय चांडक, नंदोरी ( बु. ) चे शा. व्य.स. अध्यक्ष घनश्याम ढवस, सामाजिक कार्यकर्ते मनोज दानव, नंदोरी ( बु. ) ग्रा.पं. माजी उपसरपंच भानुदास ढवस, माजी ग्रा.पं. सदस्य विनोद लांबट .महात्मा गांधी त.मु.ग्रा.स . माजी अध्यक्ष रमेश तिखट आणि  रवी खाडे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

    भद्रावती तालुक्यातील  सर्व ग्रामस्थ, नागरिक तसे शेतकरी बंधूभगिनींनी  या शिबिराचा लाभ घेत आपली मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी. असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.धनराज आस्वले, ट्रस्टचे कार्यवाहक प्रशांत कारेकर, वैभव डहाणे, प्रमोद वाघ व कल्पना टोंगे यांनी संयुक्तपणे केले आहे. तसेच सदर शिबिरा विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नंदोरीचे सरपंच मंगेश भोयर, संजय तोगट्टीवार, मुर्लीधर उमाटे आशा ताजने, वर्षा कुरेकर, प्रीती पोहाणे, सरला मालोकर, अश्लेषा भोयर आणि जयश्री फाले यांच्याशी संपर्क साधावा.