व्हाईस ऑफ मीडिया चिमूर तालुका अध्यक्ष पदी प्रा. राजू रामटेके 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि .26 डिसेंबर) :-व्हाईस ऑफ मीडिया चिमूर तालुका अध्यक्ष पदी प्रा. राजू रामटेके यांची आज (दिनांक 25 डिसेंबर ) रोजी चंद्रपूर येथे आयोजित आमसभेत झालेल्या निवडणुकीत निवड करण्यात आली.

            चंद्रपूर जिल्हा व्हाईस ऑफ मीडियाच्या आमसभेत झालेल्या निवडणुकीत जिल्हा अध्यक्ष पदावर अनिल बाळसराफ यांची निवड झाली. त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून अनिल पाटील होते.

या आमसभेत जिल्ह्यातील विविध तालुका अध्यक्ष यांची निवडणूक घेण्यात आली. यावेळी विचार मंचावर व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष मंगेश खाटीक, विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय पडोळे, जेष्ठ पत्रकार शाम ठेंगळी, प्रा. मणियार, वर्धा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

                 चिमूर तालुका अध्यक्ष पदाकरिता प्रा. राजू रामटेके व पंकज मिश्रा यांनी उमेदवारी दाखल केली होती, यात दोन्ही उमेदवरांना समान मते मिळाल्यामुळे ईश्वरचिट्ठी काढण्यात आली, यामध्ये प्रा. रामटेके हे विजयी ठरले. 

      सर्व निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जितेंद्र जोगड, श्रीहरी सातपुते, आशिष रैच,नरेंद्र देशमुख यांनी जबाबदारी संभाळली.