✒️ भद्रावती (Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
भद्रावती(दि.15 डिसेंबर) :- हुतात्मा स्मारक, भद्रावती येथे 12 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता स्वर्गीय श्री गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मुंडे साहेबांच्या स्मृतींना अभिवादन करणे तसेच समाजातील प्रश्नांवर चर्चा करून समाज बांधणीसाठी पुढाकार घेणे हा होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मराज मुंडे व चिंतामण बंगार होते.
वंजारी सेवा संघ महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष किशोर हेमके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमात स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या कार्याचा आढावा घेतला गेला तसेच समाजाच्या समस्या, त्यावर उपाय, आणि संघटनात्मक बांधणीवर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खालील व्यक्तींच्या अथक परिश्रमांचे मोलाचे योगदान लाभले:बाळासाहेब नागरगोळे,शुभाष सालवे,पांडुरंग आखाडे,हनुमंत गीते,श्रीकांत गीते,विजय धात्रक,घनश्याम हेमके,रेश्मा गुग्हे,कुमुद हेमके,पुष्पा धात्रक,कृति आखाडे,अनीता केंद्रे,शीतल गीते,दुर्गा सालवे कार्यक्रमाच्या शेवटी दयानंद तिडके आणि अनंत आखाडे यांनी आभार प्रदर्शन केले आणि उपस्थित मान्यवरांचे योगदान व सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.