दिनांक ७ ते १७ डिसेंबर रोजी भिक्खु संघ समृध्दीकरण कार्यक्रम आयोजीत

✒️सुयोग सुरेश डांगे चिमूर (Chimur विशेष प्रतिनिधी

चिमुर(दि.22 नोव्हेंबर) :- प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान व्दारा संचालित बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय धम्म अकादमीच्या वतीने उमरेड तालुक्यातील मौजा राजुलवाडी येथे दिनांक ७ ते १७ डिसेंबर रोजी भिक्खु संघ समृध्दीकरण कार्यक्रम अंतर्गत श्रामनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

उमरेड (जि. नागपुर) तालुक्यात मौजा राजुलवाडी येथे धम्म कार्य करीत असलेल्या प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान व्दारा संचालित बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय धम्म अकादमीच्या वतीने आयोजीत शिबिरात श्रामनेरांना दशशील पालन करणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर भिक्खु संघाकरीता लागु असलेले नियम, जीवनविषयक संपुर्ण पैलु, बुध्दांनी शिकविलेली ध्यानसाधना आदी विविध विषयावर मार्गदर्शन करण्याकरीता त्रिपुरा येथील पुज्य भिक्खु सारिपुत्त उपस्थित राहणार आहेत.

बुध्दशासन समृध्द करण्यासाठी भिक्खु संघ, भिक्खुनी संघ, उपासक संघ आणि उपासिका संघ हे चारही संघ समृध्द करणे आवश्यक असते. त्याकरिता प्रशिक्षित गुरुच्या वास्तव्यात व मार्गदर्शनाखाली योग्य प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. हाच उद्देश समोर ठेवुन श्रामनेर शिबिर आयोजीत करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी केली आहे.

दिनांक ७ ते १७ डिसेंबर रोजी सहभागी होण्याकरीता डॉ. माया ब्राम्हणे ९४२२४६८७४६, राजरतन कुंभारे ९४२२११४१६५ यांचेशी किंवा www.pmpdhamma.org (Course) वर संपर्क करण्याचे आवाहन प्राचार्य नरेंद्र शेंडे, विमल रामटेके, डॉ. पंडीत फुलझेले, सुखदेवजी नारनवरे, डॉ. कबीर रावळेकर, गोविंद बनकर, वसंत शिंगाडे यांनी आवाहन केले आहे. बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय धम्म अकादमी राजुलवाडी हे ठिकाण नागपुर उमरेड मार्गावरील उदासा या गावापासुन पुर्वेस ७०० मीटर अंतरावर आहे.