बल्लारपुरात पोलिसांनी केला शस्त्र साठा जप्त

🔹दोन आरोपींना केली अटक : घरातील झडती दरम्यान आढळल्या ६ तलवारी

✒️ संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.11ऑक्टोबर) :- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान कोणत्याही घातपाताच्या घटना घडू नये. या अनुषंगाने बल्लारपूर पोलीस सतर्क झाले आहे. बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीराम वार्डात एका घराची झडती घेतली. झडती दरम्यान पोलिसांनी ६ लोखंडी धारदार तलवारी, एक भाला व एक कुकरी एवढा मोठा शस्त्र साठा जप्त केला आहे. ही घटना बुधवारी रात्री ९.२५ वाजता उघडकीस आली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बल्लारपूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात बल्लारपूर पोलिसांनी शहरातील श्रीराम वार्डात राहणारे प्रमोद श्रीहरी बरडे ( ५८ ) व आकाश उर्फ पिंटू प्रमोद बरडे ( 30 ) यांना अटक केली आहे.यांचे विरुद्ध पोलिसांनी भारतीय हत्यार बंध कायद्यान्वये कलम ४,२५ गुन्हा दाखल केला आहे.

बल्लारपूर शहरातील श्रीराम वार्डात एका माहितीच्या आधारे आकाश उर्फ पिंटू बरडे यांच्या घरी धाड टाकली. धाड टाकून त्याच्या घराची झडती घेतली. झडती दरम्यान पोलिसांना मोठा धक्का बसला. बेकायदेशीर रित्या त्याने ६ लोखंडी धारदार तलवारी, एक भाला व एक कुकरी असा मोठा शस्त्र साठा आढळून आला.बेकायदेशीर शस्त्र साठा बाळगल्याप्रकरणी आरोपी म्हणून प्रमोद श्रीहरी बरडे व आकाश उर्फ पिंटू प्रमोद बरडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचे कडून शस्त्र साठा जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे, सहायक पोलीस निरीक्षक ए.एस.टोपले, उपनिरीक्षक हुसेन शाह, गजानन डोईफोडे, आनंद परचाके,रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, सुनील कामटकर, पुरूषोत्तम चिकाटे, शेखर माथनकर, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, खंडेराव माने, अनिता नायडू यांच्या पथकाने केली आहे.