परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकाचा 72 तासात विमा कंपनीला आढावा द्या…अभिजीत पावडे

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.8 ऑक्टोबर) :- आज चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र परतीचा पाऊस सर्वच तालुक्यात दाखल झाला सध्या आपल्या शेतीच्या सोयाबीन कापणी तसेच काढणी सुरू झाली आहे तेव्हा पावसामुळे होणाऱ्या आपल्या शेतीमालाच्या नुकसानीमुळे सर्व शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्यामुळे सर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तेव्हा आपल्या पिकांचे झालेले नुकसान हे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात पिक विमा कंपनीला येत्या 72 तासात नुसकानीचा आढावा पिक विमाकंपनीला द्यायचा आहे.

तरी सर्व समस्त शेतकरी बंधूंनी तात्काळ विनंती करतो की पिक विमा कंपनीच्या टोल फ्री नंबर वर आपली तक्रार देऊन त्यांच्याकडून रिसिव्ह मेसेज किंवा तक्रार नंबर घ्यावा तसेच आपली तक्रार कंपनीने नोंद करून घेतली की नाही याची पडताळणी करून घ्यावी असे आवाहन येथील शेतकरी. श्री अभिजीत गिरीधर पावडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वरोरा तथा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था चारगाव बु यांनी केले आहे. अति ..महत्वाचे जे कुणी शेतकरी यांनी आपल्या पिकाची नुकसान ची माहिती कंपनीला यापूर्वी असेल तरी पण शेतमाल काढणी किंवा हार्वेस्टिंग आपल्या तक्रारी मध्ये दाखल करावी.