श्री क्षेत्र रामदेगी येथे सामूहिक श्राद्ध तर्पण व प्रवचन सम्पन्न

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.5 ऑक्टोबर) :- चिमूर येथील श्री क्षेत्र रामदेगी येथे पितृपक्ष निमित्त चिंताहरण कपिश्वर देवस्थान तर्फे आयोजित आदरणीय श्री मंगेश महाराज यांच्या मार्गदर्शनात सामूहिक श्राद्ध तर्पण व प्रवचन कार्यक्रम यशस्वीपणे सम्पन्न झाला.

कार्यक्रमात चंद्रपूर, नागपूर, उमरेड येथील भावीक भक्त व साधक उपस्थित होते पन्नास जोडीने या सामूहिक श्राद्ध तर्पणात सहभाग घेतला.

प्रवचनात शेकडोच्या संख्येत भाविक भक्तांनी लाभ घेतला आदरणीय मंगेश महाराज यांनी आपल्या प्रवचनात श्राद्ध व तर्पण, पितृपक्ष यांचे महत्व सांगितले श्राद्ध का करावे,पित्रांना तृप्त कसे करावे कुठले उपायांनी पितरांना मुक्ती,सदगती,मोक्ष कसा मिळेल असे अनेक कथा रामायण,महाभारत, गरुड पुराण अश्या प्रमाणित ग्रंथातून शास्त्रशुद्धपणे आपल्या प्रवचनात सांगितले .

पौरोहित्य व कार्यक्रमाचे संचलन,आभारप्रदर्शन पं.सतीश गुरुजी यांनी केले.तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भीष्मचार्य ह.भ.प.फलाहारी महाराज,व श्री गणपत डाहे महाराज,ह.भ.प.शंकर कवळे महाराज व त्यांचा संच कार्यक्रम यशस्वी संस्थेचे विश्वस्थ श्री दशरथ ठावरी, विठ्ठल हनवते,प्रकाश कंगाले गुरुजी,हर्षद  महाले,सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेंद्र वांढरे, दिनेश सोनुने, प्रदीप बदकी,बाळकृष्ण तामखाने,गोविंद महाले, गणेश भुजाडे,गोपाल महाले,प्रभाकर बारेकर,लोकेश, इत्यादीनी केले.