शेगाव परिसरात चोरीचे प्रमाण वाढले

🔹खेमजई येथे लाखो रुपयाची चोरी 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.4 ऑक्टोबर) :- स्थानिक शेगाव तसेच शेगाव परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चोरीचे प्रमाणात वाढ होत असून चोरीचे थैमान काही कमी होताना दिसत नाही तसेच गेल्या दोन दिवसांपूर्वी खेमजई येथील शेतकरी श्री कन्हैयालालजी जयस्वाल यांच्या शेतातील असलेल्या बंड्यातून कोट्यातून दोन मोठमोठे हळद पकविण्याची तांब्याचे भांडे किंमत एक लाख रुपये असलेले चोरी गेले तसेच यासोबत शेतात असलेली विद्युत मोटर 40 हजार रुपये.किमतीची तसेच केबल वाहेर व भंगार साहित्य त्यांच्या बंड्यातून चोरीला गेले असा एकूण एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला सदर या चोरीची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशन शेगाव बु. येथे केली असून देखील अजून पर्यंत देखील अज्ञात चोरट्यांचा शोध लागला नाही .

शिवाय खेमजई परिसरात देखील याआधी अनेकदा विद्युत मोटारची चोरी झाल्याची घटना अनेकदा उघडकीस आली परंतु मोटर चोरी करणारे चोरटे मात्र अजून सुद्धा सापडलेले नाही त्यामुळे या भागात तसेच शेत शिवारात चोरी चे प्रकरण दिवसेंदिवस वाढतच आहे विशेष म्हणजे शेगाव परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भंगार घेणारे लोक येत असून आपल्या चार चाकी वाहनातून गावातील भंगार गोळा करून बाहेर गावी विकत असल्याची चर्चा आहे तेव्हा या भंगार विक्रेत्यांशी गावातील भुरटे चोरटे यांच्याशी काही संगणमत तर नसेल असा सवाल निर्माण होत आहे.. तेव्हा चार चाकी वाहनाने भंगार विक्री करणाऱ्या नागरिकांची विक्रेत्यांची सखोल चौकशी करून चोरट्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिक तसेच शेतकरी करू लागले आहेत.

      शिवाय आज पर्यंत शेगाव येथील पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या चोरीचा अजून पर्यंत देखील मुद्देमाल सापडलेला नाही किंवा चोर देखील सापडले नाही. कारण चोरी गेलेल्या साहित्याची बिल पावती मागत असल्याने पीडित शेतकऱ्या जवळच गेल्या दहा पंधरा वर्ष अगोदर चे बिल नसल्याने पीडित शेतकऱ्यांची तक्रार निस्वार्थ निष्क्रिय जात असते . तेव्हा बिल पावती ची अट न लावता झालेल्या चोरीची पोलिसांनी सखोल चौकशी करावी व चोरट्याला पकडून कठोर कारवाई शिक्षा करावी .